मनमाडला इंदुर-पुणे महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य…. रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीने खड्ड्यात वृक्षारोपण करून केला निषेध…
मनमाडला इंदुर-पुणे महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य….
रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीने खड्ड्यात वृक्षारोपण करून केला निषेध…
मनमाड(प्रतिनिधी) :- मनमाड शहरांतून जाणारा इंदुर पुणे महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला असुन मनमाड मधील कॅम्प ते दहेगावं या भागात अक्षरशः एक एक फूट खोल खड्डे पडले असुन या खड्ड्यामुळे रोज अपघात होत असुन यात अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे काहींना तर आपले प्राणही गमवावे लागले आहे याच महामार्गावर येवल्याच्या पुढे टोल वसुली केली जाते मात्र टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागाचे या खड्ड्याकडे दुर्लक्ष आहे या दोन्ही विभागाला जाग यावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी या खड्ड्यात वृक्षरोपंन करून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.मात्र या दोन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.अजून किती बळी घेतल्यावर या विभागाला जाग येईल असा सवाल निकाळे यांनी विचारला आहे.
मनमाड रेल्वेचे मोठे जंक्शन असून शहरातून शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग हा देशातील सर्वात व्यस्त महामार्ग म्हटले तरी वावग ठरणार नाही मध्यप्रदेश इंदोर दिल्ली उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश यासह उत्तर भारतात जाणारा तसेच पुणे सोलापूर बंगलोर कर्नाटक तामिळनाडू यासह दक्षिण भारतात जाणारा एकमेव सरळ आणि जवळचा महामार्ग आहे मालेगाव कडे जाऊन तो मुंबई आग्रा महामार्गाला कनेक्ट होतो तर इकडे सोलापूर नागपूर महामार्गाला कनेक्ट होतो यामुळे या महामार्गावर मोठया प्रमाणावर रहदारी आहे मालेगाव ते कोपरगावपर्यंत हा महामार्ग एम एम के पी एल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला बीओटी तत्वावर दिला आहे मात्र या टोलकंपनी कडून केवळ टोल वसुली सुरू असुन रस्त्यावर कोणत्याही प्रकारची सुविधा या कंपनीकडून देण्यात येत नाही सध्या पावसाळा सुरू असल्याने या महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य असुन मनमाड मधील कॅम्प ते दहेगाव या परिसरात एक एक फूट पर्यंत खोल खड्डे पडल्याने या ठिकाणी रोज अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहे काहीना तर कायमस्वरूपी अपंगत्व आले असुन अनेकांचा जीवदेखील गेला आहे मात्र ना टोल कंपनी ना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत आहे या कृत्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष युवक आघाडीचे तालुकध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांच्या नेतृत्वाखाली या महामार्गावर असलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
टोल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार..!
मनमाड शहरातून जाणारा इंदुर पुणे महामार्ग हा सर्वात व्यस्त महामार्ग म्हणून प्रसिद्ध आहे या महामार्गावर शहराच्या दोन्ही भागाला जोडणारा एकमेव रेल्वे ओव्हरब्रिज आहे या ओव्हरब्रिज वर देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत हे तर इतके भयानक आहेकी यात मोटारसायकल अर्ध्याच्या वर मावते रात्रीच्या अंधारात तर या महामार्ग अजिबात दिसत नाही आता या महामार्गावर जर अपघात होऊन कुणाचा जीव गेला तर टोल वसुल करणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू तसेच लवकरात लवकर या खड्ड्याची डागडुजी झाली नाही तर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.गुरुकुमार निकाळे, तालुकाध्यक्ष रिपाई आठवले गट