होरायझन ॲकॅडमीच्या चिमुकल्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश’नांदगाव रेल्वे स्थानकावर केली स्वच्छता
होरायझन ॲकॅडमीच्या चिमुकल्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश’नांदगाव रेल्वे स्थानकावर केली स्वच्छता
नांदगाव ( महेश पेवाल) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छता दिवस” म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेच्या चिमूकल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढत ” “हम सबने अब ये ठाना हैं ,भारत स्वच्छ बनाना है” स्वच्छतेचा संदेश दिला.मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव व नांदगाव रेल्वे स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व रेल्वे कर्मचारी यांनी (दि.२७) रोजी नांदगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छ्ता मोहीम साजरी केली या वेळी विद्यार्थ्यांनी शहरातील रेल्वे कॉलोनी या ठिकाणी रॅली काढत स्वच्छ भारत सुदंर भारत, भारत माता की जय,जल ही जीवन हे, झाडे लावा झाडे जगवा, अश्या घोषणा देत विद्यार्थ्यानी परिसर दुमदुमून टाकला होता.या वेळी रेल्वे स्टेशनचे कर्मचारी यांनी ही सहभाग घेतला.रेल्वे अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले तसेच विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकावर असलेले सर्व घटकाची व उपकरणाची माहिती दिली.कार्यक्रमास मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि.अमीतभाऊ बोरसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या .हा कार्यक्रम शाळेच्या प्राचार्या पुनम डी. मढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या वेळी शरयू आहेर, सिताराम पिंगळे,अनुराधा खांडेकर,पृथ्वीराज वडघुले,आदी शालेय शिक्षकांसह डॉ. संदीप ढोके, हुकुमसिंग पाटील स्टेशन मॅनेजर नांदगाव, बी.के सिंग, विजयकुमार दुबे ,डि.के तिवारी, सर्वेश कुमार, एम. पी सिंह, कैलास पाटील पी.पी पवार एस.एस महाजन, महाराष्ट्र पोलीस, जी.आर.पी, प्रवासी संघटना तालुका अध्यक्ष तुषार पांडे आदी सह. रेल्वे अधिकारी या स्वच्छता रॅलीमध्ये उपस्थित होते.