महाविकास आघाडीचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यलायात धरणे आंदोलन…!


मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासुन संपूर्ण शहरात वीजपुरवठा खंडित होत असुन यामुळे नागरिक मोठया प्रमाणावर त्रस्त झाले आहेत यामुळे आज उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने महावितरण अभियंता यांच्या कार्यलायात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळीं अधिकारी व कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.

Advertisement

मनमाड शहरात गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू असून मनमाड शहराचे नागरिक त्रस्त झाले आहे वयोवृद्ध महिला व लहान लेकर हे त्रस्त झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार गट राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी आंदोलन करताना कार्यकारी अभियंता यांच्या ऑफिसमध्ये बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले वीज खंडित प्रकरणी कार्यकारणी अभियंता यांच्या दानामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले माजी आमदार जगन्नाथ दादा धात्रक उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ बळीद यांच्या नेतृत्व खाली ठिय्या आंदोलन करण्यात आले उपस्थित जिल्हा संघटक संजय कटारिया युवासेना शहरप्रमुख इरफान शेख नगरसेवक लियाकत भाई शेख राष्ट्रवादी नेते रईस भाई फारुखी राजाभाऊ क करकाळे मायकल भाऊ फर्नांडिस अशोक आप्पा विवेक परदेशी राजाभाऊ कासार पिंटू सोनवणे पप्पू सुरवंशी दिलीप पठारे नगरसेवक विनू आहेर कल्याणकर दादा अनिल सपनार पंडित सानप रवी इप्पर सनी करकाळे कयाम सय्यद राजाभाऊ वाघ किशोर भाऊ कदम निलेश पाचोरकर राहुल सांगळे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!