मनमाडला भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप..!


मनमाड(अजहर शेख़):-  मनमाड शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेच्या वातावरणात लाखो भक्तांच्या लाडक्या गणरायांना मंगळवारी निरोप देण्यात आला.गणपती बाप्पा मोरया,पुढल्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणी गणेशभक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला केली जात होती. विशेष म्हणजे,पोलीसांनी डीजेच्या वापराला नियमावली लावली असल्याने  असल्याने अनेक  सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल,ताशा,लेझिम, झांज, सनई अशा पारंपारिक वाद्यांचा वापर केला होता. सक़ाळी वेशीतल्या नीलमणी गणेशाची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करुन मिरवणुक शुभारंभाचा नारळ वाढविण्यात आला. यंदाच्या मिरवणुकीमध्ये मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथक मिरवणुकीची शिवकालीन दवंडी,वाद्यवृंद (बॅण्ड), सनई चौघडा, घोडेस्वार युवती पारंपारिक वेशात श्री ढोल पथकाची मिरवणुकीमध्ये प्रात्यक्षिके आणि चंद्र सूर्य, भगवा ध्वज, मानाची अब्दागिरी आणि सुगंधीत फुलांनी सजवलेली श्री निलमणीच्या पार्थिव मुर्तीची सुशोभित पालखी, ही यंदाच्या मिरवणुकीची आकर्षणे होती.

          गणेश विसर्जन करण्यासाठी शहरतिल गणेशकुंड येथे व्यवस्था करण्यात आली होती.यासह शहरातील हनुमान नगर, विवेकानंद नगर,शांती नगर,कॅम्प या ठिकाणी कृत्रिम गणेश कुंड तयार करण्यात आले असुन या भागातील घरगुती गणपतीचे विसर्जन या ठिकाणी करण्यात यावे असे आवाहन मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले आहे.विसर्जन मिरवणुकीत १ पोलिस उपाधिक्षक १ पोलिस निरीक्षक ३ सहायक पोलीस निरीक्षक,३ उपनिरीक्षक,३५ कर्मचारी व ५० महिला,पुरूष होमगार्ड कर्मचारी यांनी बंदोबस्ताचे काम केले.ध्वनी प्रदूषण मोजणी करणारे एक पथक देखील नियुक्त करण्यात आले होते.विसर्जन मार्गावरील अनेक इमारतींच्या छतावरून देखील पोलीस कर्मचारी देखरेख करीत होते.पोलीसांनी आपले काम चोखपणे पार पाडले.त्यामुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी  यांच्या मार्गदर्शनाख़ाली राजेंद्र पाटील, अजहर शेख, जावेद शेख, मुश्ताक शेख, नाना पाटील या कर्मचारीअधिकारी यानी गणेश कुंड व इतर ठिकानी व्यवस्था केली.मिरवणुक मार्गावरील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावर्षि अनेक मंडळानी १५ फूट ते ३५ फूट ऊँच मूर्ति आनल्याने गणेशकुंड परिसरात फक्त लहान मूर्ती विसर्जन करण्यात आले.मोठ्या मूर्ती या दान करण्यात आल्या.गणेश विसर्जन करण्यासाठी अनेक समाजिक संस्थानी पुढ़कार घेटल्याने मिरवनुक़ शांततेत पार पडली. यावर्षि एकुण १३०  सार्वजनिक गणेश मंडळ तर ५०० पेक्ष्या जास्त  घरगुती गणेश मुर्तीचे  विसर्जन करणयात आले. गोदावरीचा राजा नावाने प्रसिद्ध असलेला भारतातिल एकमेव रेल्वेतील गणपतिचे यावर्षी परवानगी नसल्याने रद्द करण्यात आले होते.
डीजेच्या आवाजात कमतरता…!
गेल्या अनेक वर्षांपासून डीजे या वाद्यावर बंदी आणावी अशी मागणी होत असताना सुप्रिम कोर्टाने डीजेला ध्वनिप्रदूषण मर्यादा घालून दिली आहे यावर्षी पोलीस निरीक्षक विजय कारे यांनी डीजे चालकांना बैठक घेऊन आवाहन केले व आवाजाची मर्यादा ठेवण्यासाठी विनंती केली यावरून या वर्षी सर्व डीजे चालकांनी व गणेश मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले यामुळे डीजेच्या आवाजात यावर्षी कमतरता बघायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!