दोरखंड शॉर्ट फिल्मला नाशिक येथेही अवार्ड
दोरखंड शॉर्ट फिल्मला नाशिक येथेही अवार्ड
मनमाड (अजहर शेख):- महर्षी चित्रपट संस्था आयोजित शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हल 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक उत्कृष्ट फिल्मने आपला सहभाग नोंदविला होता.त्यात दोरखंड शॉर्ट फिल्मला विशेष शॉर्ट फिल्म म्हणून अवार्ड देण्यात आला.हा अवार्ड स्विकारताना दोरखंड शॉर्ट फिल्म चे सर्व कलाकार टिमचे मान्यवारांकडुन विशेष कौतुकाची थाप पडली….
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज खताळ हे होते तर सिने क्षेत्रातील अभिनेत्री, अभिनेते व सामाजिक काम करणारे मान्यवर मंचकावर उपस्थित होते.फेस्टीवलचे आयोजक निशीकांत पगारे , निर्माता दिग्दर्शक लेखक दिनकर पांडे व सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.दुसरा बचपण या शाॅर्ट फिल्मने प्रथम अवार्ड पटकीवीला…अवार्ड स्विकारताना निर्माता दिग्दर्शक लेखक हिरामण मनोहर, अभिनेत्री ज्योती मेरे,साक्षी गरूड,शिल्पा सुकटे, वैष्णवी धुमाळ,मुख्य अभिनेते भुषण काश्यपे,अजय बिरारी, मास्टर अश्फाक आदी उपस्थित होते.