इंडियन ऑइल कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण
इंडियन ऑइल कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण
मनमाड(अजहर शेख):- गेल्या वीस वर्षापासून इंडियन ऑइल या तेल कंपनीकडे आमच्या अडीच हेक्टर पेक्षा जास्त जमिनी गेलेल्या आहेत जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी देण्यात येणार होती मात्र या कंपनीतर्फे आम्हाला कोणत्याही प्रकारची नोकरी देण्यात आलेली नाही याबाबत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करत आहोत अनेक आंदोलने केली मात्र कंपनी आम्हाला उडवडीचे उत्तर देत आहे यामुळे आम्ही कंपनी समोर आमरण उपोषण सुरू केले असल्याचे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पाणी देखील पिणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे
मनमाड नजीक असलेल्या नागापूर येथे इंडियन ऑइल या इंधन कंपनीची स्थापना झाली या कंपनीसाठी स्थानिक शेतकऱ्यांची शेतीची जागा घेण्यात आली यातील अनेक शेतकऱ्यांना जागेचे मोबदल्यात पैसे व नोकरी देण्यात आली मात्र यातील अनेक शेतकरी या मोबदल्यापासून वंचित आहेत याच वंचित शेतकऱ्यांनी याला वीस वर्षांपासून कंपनी विरोधात लढा सुरू ठेवला असून इंडियन ऑइल कंपनीतर्फे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी देण्यात येत नाही यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी इंडियन ऑइल कंपनी समोर आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही तसेच अन्न तर सोडा पाणी देखील घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे यामुळे भविष्यात हे आंदोलन चिघळून नागापूर ग्रामस्थ तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील उपोषणकर त्यांच्या वतीने ग्रामस्थांनी दिला आहे मनोज नागू मोरे शुभम दिलीप मोरे नागेश राजाराम हराळे या तिघांनी हे आमरण उपोषण सुरू केले असून दोन दिवसापासून उपोषण सुरू असून देखील कंपनीच्या वतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे
वीस वर्षापासून लढाई सुरू आता माघार नाही1997 पासून इंधन कंपनी स्थापन झाली तेव्हापासून आमच्या गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेले आहेत त्यांना काही ना काही मोबदला मिळाला आहे मात्र आम्ही तिघं आमच्यासोबत अजून 11 जण आम्ही गेल्या 20 वर्षापासून इंडियन ऑइल कंपनीकडे आमच्या जागेच्या मोबदल्यात नोकरी मिळावी याचा पाठपुरावा करत आहे मात्र कंपनीतर्फे आजपर्यंत केवळ उडवडीचे उत्तरे देण्यात आली आहे आता जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत माघार नाही मेलो तरी चालेल मात्र आता माघार घेणार नाहीमनोज नागो मोरे उपोषणकर्ते