मनमाडनजीक  असलेल्या रापली येथील कृष्णाचा सापडला विहिरीत मृतदेह…! कालपासुन होता बेपत्ता…!


मनमाडनजीक  असलेल्या रापली येथील कृष्णाचा सापडला विहिरीत मृतदेह…! कालपासुन होता बेपत्ता…!
मनमाड(अजहर शेख)  :-मनमाड शहराला खेटून असलेल्या रापलीगाव येथून पाच वर्षाचा कृष्णा नावाचा चिमुकला काल पासून बेपत्ता होता आज शोध कार्य सुरू असताना सायंकाळी सव्वा सात वाजता त्याचा मृतदेह घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला असुन हा अपघात की घातपात याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नसुन या घटनेची पोलीस चौकशी करत आहे.
             मनमाड नजीक असलेल्या रापली या गावातील पाच वर्षाचा चिमुकला कालपासून गायब झाला होता कृष्णा बिडगर असे या बालकाचे नाव होते .गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी या बालकाचा सर्वत्र कसून शोध घेतला मात्र तो कुठेही मिळून आला नव्हता  परिसरातील विहिरीत उतरून देखील त्याचा शोध घेण्यात आला मात्र या बालकाचा थागपत्ता लागला नाही त्यामुळे या बालकाचे  अपहरण तर करण्यात आले नाही ना?अशी शंका उपस्थित केली जात होती . या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक कैलास वाघ आदिनी गावाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी बालकाच्या पालकाशी चर्चा करून माहिती घेतली.मात्र कृष्णा कुठेही मिळून आला नाही मात्र गावातील काही तरूणांनी घराशेजारी असणाऱ्या सर्व विहिर पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला यात त्यांना यश आले व घराशेजारी असणाऱ्या एका विहिरीत कृष्णाचा मृतदेह आढळून आला या घटनेने गावासह संपूर्ण चांदवड तालुका व मनमाड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या लहान मुलांचा अपघात झाला की घातपात झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नसून या घटनेचा चांदवड तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास पोलीस करत आहे.
संपूर्ण गावासह पोलिसांनी घेतला चोवीस तास शोध…!
बदलापूर येथील घटनेसह राज्यातील इतर घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन रापली गावातील नागरिक यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह उपविभागीय पोलीस अधीक्षक पोलिस निरीक्षक यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून सर्व बाजूने अंदाज लावून शोध कार्य सुरू केले काल सकाळी साडे अकरा पासुन ते आज मृतदेह मिळेपर्यंत संपूर्ण गावासह पोलिसांनी चोवीस तास शोध केला.
सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी काढला मृतदेह बाहेर
कृष्णाचा मृतदेह मिळाला खरा मात्र 10 परस विहिरीत कोण उतरेल आणि कोण काढेल असा प्रश्न पोलिस व ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला मात्र चांदवड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्र असलेले भागवत झालटे यांनी तात्काळ विहिरीत उतरुन मृतदेह बाहेर काढण्याची तयारी दर्शवली व ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला भागवतच्या या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!