शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी वसंत खैरनार तर सरचिटणीसपदी प्रमोद चिंचोले यांची निवड
शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी वसंत खैरनार तर सरचिटणीसपदी प्रमोद चिंचोले यांची निवड
नाशिक (प्रतिनिधी):- नाशिक जिल्हयातील शिक्षणविस्तार अधिकारी यांची जिल्हास्तरीय कार्यकारिणी निवडीसंदर्भात राज्याध्यक्ष कैलास सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी नारायण विद्यालयाच्या प्रांगणात नुकतीच बैठक झाली.या बैठकीत शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या विविध अडचणी व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
दहावी, बारावी परीक्षेला परीरक्षक म्हणून वर्ग दोन अधिका-यांची प्राधान्याने नेमणुक करणे, शालेय पोषण आहार अधीक्षक यांनी शासननिर्णायाप्रमाणे योजनांचे कामकाज पाहणे, शिक्षण विस्तार अधिकारी यांची रिक्तपदे तातडीने भरणे, आस्थापना विषयक कामकाज संबधित यंत्रणेने करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले मॉडेल स्कुल, स्पेलिंग बी, मिशन नवोदय, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, मिशन आत्मनिर्भर, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी आदी विषयांवर चर्चा करुन नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे सर्व उपस्थितांनी याप्रसंगी सांगितले.निवृत्त होणा-या शिक्षण विस्तार अधिकारी बांधवांचा यथोचित सत्कार करण्याबाबत देखील ठराव करण्यात आला. तसेच कैलास सांगळे यांची राज्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यानंतर सर्वानुमते चर्चेतून खालीलप्रमाणे कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना शाखा नाशिक नूतन कार्यकारणी अशी-
जिल्हाध्यक्ष- श्री.वसंतराव खैरनार
जिल्हा सरचिटणीस- श्री.प्रमोद चिंचोले
कार्याध्यक्ष- श्री.सतीश बच्छाव
कोषाध्यक्ष-डॉ. विजय बागुल.
जिल्हा सल्लागार-धनंजय कोळी
जिल्हा महिला प्रतिनिधी- सुनिता अहिरे
त्याचबरोबर तालुका प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली.
विभागीय अध्यक्ष/सचिव पदासाठी आर.आर.बोडके यांचे नाव सुचविण्यात आले असुन त्याबाबत राज्यकार्यकारणीला कळविण्यात आले आहे.लोकशाही पद्धतीने सदर कार्यकारिणी निवडीसाठी मनोहर सुर्यवंशी,भाऊसाहेब जगताप, कैलास पगार, विजय पगार यांनी कामकाज पाहिले.