श्री. गुरु गोबिंद सिंग हायस्कुल मनमाडला लाईफ टाईम अचिव्हमेंट आवार्ड
श्री. गुरु गोबिंद सिंग हायस्कुल मनमाडला लाईफ टाईम अचिव्हमेंट आवार्ड
मनमाड(अजहर शेख):- मनमाड येथील श्री गुरु गोबिंद सिंग हायस्कुलला दिल्ली येथील “नॅशनल स्कुल असोसिएशन” तर्फे Life Time Achievement देण्यात आला.हे मानाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी गुरुद्वारा प्रमुख बाबा रणजित सिंग व शाळेचे
प्रशासक श्री सुखदेव सिंग यांना दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले होते.मनमाड मधील पहिली इंग्रजी माध्यमाची ही शाळा १९८२मध्ये
स्थापन होऊन आज शाळेने ४२वर्ष प्रगतीपथावर वाटचाल
केली आहे. या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात
यशाच्या शिखरावर कार्यरत आहेत. शाळेने ज्ञान, विज्ञान,क्रीडा या शैक्षणिक उद्दिष्ठानबरोबरच राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, बंधुता,समानता इ. राष्ट्रीय व समाजिक मूल्यांचा पुरस्कार उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून या राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिकाचे श्रेय संस्थाचालका बरोबर आजी माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनाही जाते, असे उदगार बाबा रणजित सिंग व प्रशासक सुखदेव सिंग यांनी काढले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे
अभिनंदन ही केले.