अधिस्वीकृतीसाठी ग्रामीण पत्रकारांना सहकार्य करा जिल्हा माहिती अधिकारींकडे यशवंत पवार यांची मागणी
अधिस्वीकृतीसाठी ग्रामीण पत्रकारांना सहकार्य करा जिल्हा माहिती अधिकारींकडे यशवंत पवार यांची मागणी
नाशिक (प्रतिनिधी): वर्षानुवर्षांपासून पत्रकारिता करणार्या ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका सुलभतेने प्राप्त व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करावे अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिकचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे.
नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांची काल भेट घेतली.यावेळी श्री.साळुंखे यांचे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पुष्प गुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले.
या भेटीप्रसंगी पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता अधिस्वीकृतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरतेवेळी माहिती अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना योग्य मार्गदर्शन केल्यास अधिस्वीकृती समितीसमोर नामंजूर किंवा त्रुटी काढण्याचे प्रमाण कमी होईल व समितीलाही पडताळणी करणे सुलभ होईल असे यशवंत पवार म्हणाले तसेच अनेक ज्येष्ठ पत्रकार तीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिताकरुन निवृत्त झाले आहेत मात्र किचकट अटीशर्तींमुळे पेंशन योजनेपासून वंचित राहिले आहेत.त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानपुर्वक पेंशन लागू करावी आणि व्हीव्हीआयपींच्या दौर्याप्रसंगी वृत्तांकन करण्यासाठी छोटे-मोठे वृत्तपत्र वा वृत्तवाहिनी प्रतिनिधि असा भेदभाव न करता सरसकट सर्व पत्रकारांना पासेस दिले जावेत अशी मागणीही यावेळी यशवंत पवार यांनी जिल्हा माहिती अधिकरींकडे केली.
शहर व ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडविण्साठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे,नाशिक तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी,सरचिटणीस संजय परदेशी उपस्थित होते.