मालेगावात सर्व जागृत शिवप्रेमींच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन..
मालेगावात सर्व जागृत शिवप्रेमींच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन..
मालेगाव(अजहर शेख):- मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या 35 फूट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याबाबत सखोल चौकशी करून संबंधित मूर्तिकार ,अधिकारी आणि प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध आंदोलन करण्यात आले.संबंधित ठेकेदारास अनुभव नसताना आणि महाराष्ट्रात प्रचंड अनुभव असलेले मूर्तिकार उपलब्ध असताना पुतळा बनवण्यासाठी कोणत्या निकषांवर देण्यात आला ?पुतळा बनवल्यानंतर कोणत्या यंत्रणांनी पुतळ्याच्या गुणवत्ता आणि मजबुती बाबत अहवाल देवून मंजुरी दिली ?
यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत किंवा कुणाच्या आशीर्वादाने हे टेंडर काढण्यात आले ?आपटे नामक मुर्तीकाराने अफजल खान वधाचा वेळी त्याचा वकील कृष्णा भास्कर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील वार केलेला वार या मूर्तीत दाखवण्यात आला.हे दाखव कोणती मानसिकता होती ?
याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पुतळा दुर्घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी दुर्दैवी गोष्ट आहे. पण त्याहूनही जास्त आपटे नामक मूर्तिकार आणि त्याच्या फेसबुकवर सहस्त्रबुद्धे नामक व्यक्तीने केलेली खोचक टिप्पणी ही महाराष्ट्रातील वर्ण वर्चस्ववादी मानसिकता दर्शवते आहे ही अतिशय शरमेची बाब आहे. या सर्व बाबतीत सखोल चौकशी करावी यासाठी मालेगावी तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मराठा सेवा संघ,मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड यासारख्या सामाजिक संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेसपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष, या राजकीय पक्षासोबत, साथी प्रतिष्टान, यासह असंख्य शिवप्रेमी या वेळी उपस्थित होते.यावेळी डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील, राजेंद्रभय्या भोसले, प्रसादबापू हिरे, शिवश्री अनिल पाटील,पवन दादा ठाकरे, अमोल निकम,जगदीश खैरनार, हरिदादा निकम,सागर पाटील,शरद खैरनार,शेखर पगार,निखिल पवार,कैलास तीसगे,मनमाड येथील फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे फिरोज भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.साथी प्रतिष्ठान चे सदस्य व माजी सरपंच प्रकाश वाघ, ताउभैय्या परदेशी ,उमेशबापु अस्मर आणि सहकाऱ्यांनी आंदोलनात चळवळीची गाणी सादर केली.संजय भाऊ महाले,प्रमोद शुक्ला,दीपक पवार,दीपक पाटील,राजाराम जाधव,संदीप पवार,जयेश अहिरे,निकेतन बच्छाव, भरत पाटील,प्रमोद शुक्ला, विनोद चव्हाण,विकी खैरनार, सोमनाथ खैरनार, वाय के खैरनार , शरद खैरनार, दशरथ बापू निकम, नंदूकाका शिरोळे,सुधीर चव्हाण, नथुपंच खैरनार, नाना शेवाळे, मयूर वांद्रे,किशोर जाधव,जगदीश निकम,मनोज गोसावी,भैय्या पाटील,करण भोसले,दीपक बच्छाव,योगेश टेमरे,अनिल जाधव,योगेश कळमकर,रोहित बागुल,वैभव जगताप,गौरव शेलार, बिपिन बच्छाव दिनेश पाटील,आदींसह हजारो शिवप्रेमी होते.