ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे निदर्शने…!
ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे निदर्शने…!
मनमाड(आवेश कुरेशी):- ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखा मनमाड तर्फे व असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या अरक्षणाला वर्गीकरण व क्रिमिनल लागू करण्याचा निर्णय दिला आहे त्या संदर्भात केंद्र सरकारने कायदा करून जुने आरक्षण द्यावे यासाठी मुख्य कारखाना प्रबंधक, केंद्रीय इंजिनिअर कारखाना येथे कारखाना शाखेचे अध्यक्ष सतिष केदारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य विरोध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात १ऑगस्ट २०२४ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या आरक्षणा संदर्भात वर्गीकरण व क्रीमीलेयरची अट लागू करण्याचा निर्णय दिला.सदर निर्णय अनुसूचित जाती जमाती या घटकावर अन्यायकारक असून त्या संदर्भात केद्र सरकारने सदर निर्णय सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय निष्प्रभ व्हावा यासाठी संसदेत कायदा करून सदर घटकांना दिलासा द्यावा. तसेच
न्याय व्यवस्थेतील कॉलेजियम पद्धत बंद करून भारतीय न्यायिक सेवेची निर्मिती करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात ऑल इंडिया एस सी/ एम टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या मागणी पाठिंबा दर्शविला व उचित कार्यवाहीसाठी हेड कॉटरला पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी सचिन इंगळे,शरद झोबाड, प्रविण बागुल, महेंद्र चौथमल आदिचे भाषणे झाली. कारखाना शाखाचे अध्यक्ष सतिष केदारे, कारखाना शाखेचे सचिव प्रविण अहिरे, कार्याध्यक्ष किरण आहीरे, अतिरिक्त सचिव सागर गरूड, ओपन लाईन शाखा मनमाडचे खजिनदार रत्नदिप पगारे, रोहित भोसले,,प्रकाश बोडके, रमेश केदारे, संतोष सोनवणे, सुनील भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप पगारे प्रभाकर निकम, विनोद झोडपे,निखिल सोनवणे, वनिता शिंदे, रमाबाई निकम, पंढरीनाथ पठारे, वरुण म्हस्दे, दिपक अस्वले, संदिप आहिरे,राजू बदैय्या, गणेश वेन्नाल्लु, फकीर सोनवणे, विनोद खरे,सुनिल सोनवणे, सुभाष जगताप, संदिप पगारे, बाळू मोरे,हर्षद सुर्यवंशी,प्रशांत निकम,प्रेमदिप खडताळे,विशाल त्रिभुवन, राहुल शिंदे,अभ्युद्य बागुल, रमेश पगारे,सचिन पगारे, राजेंद्र सोनवणे, विकास अहिरे, विकास कराड,नदिम सैय्यद,राकेश ताठे, निलेश पारधे, अर्जुन बागुल,सागर साळवे, सुभाष खरे,प्रशांत मोरे,रूपेश साळवे, संजय गायकवाड, आदी उपस्थित होते.नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, कारखाना शाखा, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ,ओ.बी.सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखा,आर.एम.बी.के.एस.कारखाना शाखा मनमाड यांनी जाहीर पाठिंबा दिला.