एच ए के हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनीना स्वयंरक्षण धडे
एच ए के हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनीना स्वयंरक्षण धडे
मनमाड(अजहर शेख) :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं सुरक्षेसाठी समूपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी मनमाड शहर पोलीस स्टेशन मार्फत महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ. मालिनी अंबोरे यांना समुपदेशन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.अंबोरे मॅडम यांनी उपस्थित विदयार्थीनींना स्वयं सुरक्षेसाठी आत्मनिर्भर बनण्याचे धडे देऊन कायदे विषयक विविध कलमांची माहिती दिली. व विदयार्थीनींच्या विविध समस्यांचे निराकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.तसेच मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे,संस्थेचे सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.