मनमाडला 19 वर्षीय तरुणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल…! आरोपी अटकेत..!


मनमाडला 19 वर्षीय तरुणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल…! आरोपी अटकेत..!

मनमाड(प्रतिनिधी) ;- मनमाड येथील शांती नगर भागात राहणाऱ्या एक 19 वर्षीय तरुणाने  तीन वर्षीय मुलांवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करून मालेगाव येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय करे यांनी दिली आहे.बदलापूर येथील घटना ताजीच असल्याने आम्ही वेळ वाया न घालवता तात्काळ आरोपीला अटक करून त्याचे व त्या लहान मुलाचे मेडिकल करून त्याला कोर्टासमोर हजर केले असेही कर यांनी सांगितले

Advertisement
                राज्यभरात सुरु असलेल्या अल्पवयीन मुला, मुलीवर अत्याचाराचा घटना सुरूच असून अशीच एक खळबळ जनक घटना मनमाड शहरात समोर आली आहे एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या साडेचार वर्षाच्या मुलाला घरात बोलून त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.या मुलाचे पालक घरी आल्यानंतर मुलाने त्याच्या सोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकून त्याच्या विरुद्ध पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील शांतीनगर येथे राहणारा 19 वर्षे तरुण व त्याच्याच घरात वरच्या मजल्यावर राहणारा एका चार वर्षे लहान मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार त्याचे पालक घरी नसताना घडला पालक घरी आल्यानंतर त्या लहान मुलांनी त्याच्या आईला सांगितले की दादा ने माझ्यासोबत असं करण्याचा प्रयत्न केला यानंतर त्या चार वर्षीय मुलाच्या पालकांनी तात्काळ त्या लहान मुलाला घेऊन शहर पोलीस स्टेशन गाठले राज्यभरात सुरू असलेल्या अशा घटना व बदलापूर येथील घडलेली घटना याचे गांभीर ओळखून शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तात्काळ लहान मुलांना मेडिकल करण्यासाठी नेले व व आरोपी तरुणांला देखील अटक केली त्याची देखील मेडिकल केली व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोवर हे करत आहेत
शहरातील सर्व शाळेत महाविद्यालयात जनजागृती करणार..!
बदलापूर येथील घटना यासह राज्यभरात तसेच देशात तरुणांकडून तसेच वासनाधीन हैवानांकडून तीन ते चार वर्ष लहान मुलं मुली यांच्यासह अल्पवयीन मुला मुलींना गोड बोलून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशा अनेक घटना घडून जातात मात्र अनेक घटनांचा उलगडा होत नाही यामुळे मी स्वतः मनमाड शहर व परिसरात असलेल्या सर्व शाळा महाविद्यालयात लहान मुलांना जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार आहे याशिवाय आपल्या परिसरात कुठेही अशी घटना घडली किंवा असा प्रकार घडत असला तर तात्काळ पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन मनमाड शहर पोलीसतर्फे करण्यात आले आहे
विजय करे पोलीस निरीक्षक मनमाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!