स्वार्थासाठी गद्दारी करणारा मिंदे तुमचा लाडका भाऊ होऊच शकत नाही ; आदित्य ठाकरे


स्वार्थासाठी गद्दारी करणारा मिंदे तुमचा लाडका भाऊ होऊच शकत नाही ; आदित्य ठाकरे
मनमाड येथील सभेत आदित्य ठाकरेचा प्रहार

मनमाड(आमिन शेख):- जी भाजपा दहा वर्षांपूर्वी पंधरा लाख रुपयांबद्दल बोलत होती तीच भाजपा पंधराशे रुपयावर आली आणि त्यांची बोली बोलणारा आमदारकी मंत्रीपद आणि अजुन बरच काही स्वीकारून स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे सोबत गद्दारी करणारा मिंदे तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का एकीकडे लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये दिले आणि दुसरीकडे राज्यात महिलांवर अत्याचार वाढले तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याला पाठीशी घालणारा तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का गर्भवती महिलेला दहा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवणारा लाडका भाऊ होऊ शकतो का अशी खरमरीत टीका युवासेना प्रमुख माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी युती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली मनमाड येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभेमधून ते बोलत होते यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर ताशेरे ओढले शेतकऱ्यांना न्याय नाही युवकांना न्याय नाही महिलांना न्याय नाही अशा भाजपाला किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्र पक्षांना तुम्हि मतदान करणार का असा सवाल करत आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या गद्दाराना त्यांची जागा दाखवा असेही ठाकरे म्हणाले यावेळी मंचावर नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शिवसेना उपनेते वसंत गिते,दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे,दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे येवला जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्यासह उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक ,जिल्हा संघटक संजय कटारिया, कैलास भाबड नगरसेवक लियाकत शेख,यांच्यासह आदीजन उपस्थित होते.

Advertisement

मनमाड नांदगाव विधानसभा क्षेत्रात आज आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमान सन्मान यात्रा आली या यात्रेनिमित्त त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला यावेळी त्यांनी शिंदे सरकार व भाजप सरकार वर टीकास्त्र सोडले यावेळी जनतेला भूलथापा देण्याचं काम भाजप व मिंदे सरकार करत आहे या भूलथापांना बळी न पडता जनतेने या सरकारला त्यांची जागा दाखवा इथे जेवढे जण उपस्थित आहे ते सर्वजण माझ्यासोबत असतील तर त्यांनी आपली वज्रमूठ उंच करा असे सांगताच सर्व सभामंडपात असलेल्या नागरिकांनी आपले हात उंचावून हाताची मूठ दाखवत आम्ही सोबत असल्याचे सांगितले.यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गोटू केकान,प्रमोद पाचोरकर,पिंटू कटारे,इरफान शेख,पंडित सानप यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडकी बहीन योजनेवर टीकास्त्र…!
सध्याचे भाजपा व मिंदे सरकार हे लबाड लोकांचे सरकार आहे ते कुणालाही पैसे देत नाही उलट पैसे घेऊन ते गद्दारी करतात त्यांच्या नावावर गद्दार असा शिक्का आहे आणि भाजपा सोबत जाऊन ते खोटं बोल पण रेटून बोल हेही चांगल्या प्रकारे शिकले आहेत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणूक स्टंट आहे निवडणूक होताच या योजेतून अनेक महिलांना डावलण्यात येईल याशिवाय पुन्हा परत पैसेही मिळणार नाही अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजेवर केली.

गर्दीत असतांनाही महिलांचे निवेदन स्वीकारले..!
आदित्य ठाकरे यांचे सभास्थळी अर्धा तास उशिरा आगमन झाले गाडीतून उतरताच कोणत्याही प्रकारचे सोपस्कार न स्वीकारता थेट भाषणाला सुरवात केली व भाषण केले संपताच गाडीकडे जायला निघाले तालुक्यातील अनेक शिवसेना नेते शिवसैनिक सत्कार करण्यासाठी उभे होते ते न घेता शालेय पोषण आहार समितीच्या आलेल्या महिलांच्या शिष्टमंडळाकडुन त्यांचे निवेदन स्वीकारले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!