मनमाडला पांझन नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह…!


मनमाडला पांझन नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह…!

मनमाड( अजहर शेख):- मनमाड शहरांतून वाहणाऱ्या पांझन नदी पात्रात हुसेनी चौकात असलेल्या पुलाजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असुन संपूर्णपणे गाळात अडकलेल्या या व्यक्तीची ओळख पटलेली नसुन घटनेची माहिती मिळताच मनमाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असुन मृतदेह कुणाचा याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

Advertisement
              मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझन नदी पात्रात हुसेनी चौक याठिकाणी असलेल्या छोट्या पुलाखाली एक अर्धनग्न असलेल्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला असुन या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला शहरात आशा प्रकारे मृतदेह मिळाल्याने बघ्यांची एकच गर्दी जमा झाली होती मृतदेह कुणाचा याचा शोध लागला नसुन मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.आत्महत्या की घातपात या बाबत अधिकृत माहिती पोलिसांनी दिली नसुन शवविच्छेदन झाल्या नंतरच याबाबत काही समजु शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!