भारत बंद निमित्ताने मनमाडला भर पावसात भिम सैनिकांचा एल्गार मार्च …!
भारत बंद निमित्ताने मनमाडला भर पावसात भिम सैनिकांचा एल्गार मार्च …!
मनमाड(अजहर शेख):- अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण व क्रिमिलियरचा निर्णय रद्द करावा त्याविषयी कायदा संसदेत पारित करावा यासह अनुसूचित जाती व जमातीच आरक्षण नवव्या सूचित समाविष्ट करावे कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी नांदगाव तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधीक्षक हे अनुसूचित जाती व जमातीवर होणारे अन्याय व त्या संदर्भात असलेल्या सर्व केसेस काढून निःपक्षपाती अधिकारी यांच्याकडे तपास द्यावा यासह इतर मागण्या साठी आज भारत बंद पुकारण्यात आला होता यानिमित्ताने आज मनमाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला शहरातील सर्व दुकाने आज बंद आहेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शहर बंद ठेवण्यात आले होते.यावेळी भिमसैनिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला भर पावसात हा मोर्चा काढण्यात आला होता मनमाड शहरातील विविध मार्गावरून हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आणून याठिकाणी छोटेखानी सभा होऊन मोर्चाचा समारोप करण्यात आले.
सुप्रिम कोर्टाने अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण व क्रिमिलियरचा निर्णय दिला या निर्णयाला त्वरित स्तगीति द्यावी त्यविषयी कायदा करून कायदा संसदेत पारित करावा याशिवाय अनुसूचित जाती व जमातीच्या इतर न्यायहक्क मागण्याकरिता तसेच नांदगांव तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिक्षक यांच्यातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शुभम पगारे याची हत्या झाली या हत्येचा पोलिस हेतुपरस्प्सर तपास करत नाही यामुळे आरोपी अजुनही मोकाट फिरत आहे या घटनेची सखोल चौकशी व्हावी याशिवाय एसआयटी मार्फ़त चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी घेऊन आज मोर्चा काढून निषेध करण्यात आला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग येथून मोर्चाला सुरवात करण्यात आली शहरातील पाकीजा कॉर्नर नगीना मशीद एकात्मता चौक या मार्गाने मोर्चा डॉ आंबेडकर पुतळ्याजवळ नेण्यात आला याठिकाणी मोर्चाचे छोटेखानी सभेत रूपांतर झाले यावेळी प्रवीण पगारे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, गणेश धात्रक,ऍड सुधाकर मोरे,पी आर निळे,आम्रपाली निकम,वैशाली पगारे,फिरोज शेख,रतन सोनवणे, यांच्यासह इतर मान्यवरांनी भाषणे करून वरील मुद्द्यावर प्रकाश टाकला.यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक व सर्कल अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी अनेकांनी मनमाड पोलीस हे राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला.

तालुक्यातील प्रत्येक कार्यालय राजकीय दबावाखाली…!
नांदगाव तालुक्यातील मनमाड नांदगाव शहर पोलिस स्टेशन यासह नगर पालिका तहसील कार्यालय तसेच इतर सर्वच प्रशासकीय कार्यलाय व येथे काम करणारे सर्व अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत मुळात समाजाला या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून न्याय हवा असतो मात्र हे याउलट काम करतात हा सगळा प्रकार निंदनीय आहे तालुका हा हुकमशाहीकडे वाटचाल करत आहे याचा बिमोड करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित यावे व तालुक्यातील ही हुकूमशाही मोडीत काढावी व पोलीसाचा आदरयुक्त दरारा निर्माण व्हावा.
पी आर निळे,रिपब्लिकन पार्टी जिल्हा नेते

पोलिसांनी न्याय द्यावा जनता रस्त्यावर उतरणार नाही..!
कोणत्याही शहरात पोलीस हे सरकारी पगार घेऊन जनतेची नोकरी करतात मात्र नांदगाव तालुक्यातील पोलीस हे याउलट काम करत असुन राजकीय दबावाखाली काम करून ते खोटे गुन्हे दाखल करण्याच काम करतात यामुळे ते नेमके पगार कुणाचा घेतात असा घणाघाती टोला वैशाली पगारे यांनी लगावला व नव्यानेच रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक यांनी आता आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली.

फोटो कॅप्शन
मनमाड येथे भीमसैनिकांतर्फे विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले सर्व धर्मीय महिला पुरुष (छाया अजहर शेख)