मनमाडच्या नागराज मंजुळेची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड…! दोरखंड या शॉर्टफिल्मची निवड…


मनमाडच्या नागराज मंजुळेची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड…! दोरखंड या शॉर्टफिल्मची निवड…
मनमाड(अजहर शेख): – एखाद्या व्यक्तीला एखादा छंद असतो आणि तो छंद इतका मोठया प्रमाणावर असतो की त्या छंदाच वेडेपणात रूपांतर होत आणि हाच वेडेपणा एखाद्या दिवशी देशात विदेशात प्रसिद्ध मिळून देतो असाच काहीसा वेडा आणि हौशी कलाकार म्हणजे मनमाड शहरातील हिरामण मनोहर उर्फ पेंटर पेशाने पेंटर असलेले हिरामण मनोहर यांच्या शॉर्ट फिल्म दोरखंडला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट फिल्म पुरस्कार मिळाला तर गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोरखंड शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली आहे.यामुळे पेंटर हिरामण मनोहर यांच्या माध्यमातून मनमाड शहराचे नाव चित्रपट सृष्टीत देखील गाजत आहे.मनमाडचे नागराज मंजुळे म्हणून त्यांची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
                   रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल तर्फे  आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल बेस्ट फिल्म पुरस्कार सोहळ्यात मनमाड येथील शॉर्ट फिल्म निर्माते पेंटर हिरामण मनोहर यांच्या दोरखंड या चित्रपटाने सहभाग घेतला होता या स्पर्धेत  देश विदेशातुन एकुण 1400 शाॅर्ट फिल्लने  भाग घेतला होता त्या पैकी 70 शाॅर्ट फिल्मची  निवड करण्यात आली होती यात दोरखंड या शाॅर्ट फिल्मने  चांगले गुण मिळवत बेस्ट फिल्म अवार्ड पटकावला छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील डॉ मौलाना अब्दुल कलाम अभ्यासीका येथे मान्यवरांच्या हस्ते निर्माता दिग्दर्शक लेखक हिरामण मनोहर व मुख्य भूमिका साकारणारे भूषण काश्यपे यांनी बेस्ट फिल्म अवार्ड स्विकारला
तर गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील  दोरखंड शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली असून काही दिवसातच गोवा इंटरनॅशनल फिल्म   फेस्टिव्हलमध्येही दोरखंड शॉर्ट फिल्मला चांगला अवार्ड मिळवून आणु अशी अपेक्षा हिरामण मनोहर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!