फुले शाहू आंबेडकर मुस्लिम मंच तर्फे रामगिरी बाबा वर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन सादर
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम मंच तर्फे रामगिरी बाबा वर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन सादर
मनमाड (प्रतिनिधी):- मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपाह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे निवेदनाद्वारे मनमाड शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे
कोपरगाव तालुक्यातील सरला बेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आपल्या प्रवचनातून आक्षेपार्ह वक्तव्य केले या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहे याच घटनेला अनुसरून मनमाड शहरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे पोलीस निरीक्षक विजय कारे यांना निवेदन देण्यात आले मुळात आम्हा सर्वांचे प्रिय असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत संपूर्ण अभ्यास करूनच वक्तव्य करायला हवे होते मात्र चुकीची माहिती देऊन दोन समाजात ते निर्माण होईल व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केले आहे मुळात चुकीची माहिती सांगून समाजातील जनतेला भडकवण्याचे काम हे महाराज करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पगारे अध्यक्ष मिर्झा बेग कार्याध्यक्ष फिरोज शेख सचिव विलास अहिरे अमीन शेख इस्माईल पठाण शकूर शेख विनोद अहिरे हाजी रफिक बाबूजी जावेद मंसुरी हाजी शफी जावेद शेख सद्दाम अत्तार यांच्यासह इतर पदधिकारी यांच्या सह्या आहेत.