शिवसेनेच्या भगवा सप्ताहास प्रचंड प्रतिसाद : गणेश धात्रक
शिवसेनेच्या भगवा सप्ताहास प्रचंड प्रतिसाद : गणेश धात्रक
मनमाड(महेश पेवाल ):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी असा संदेश देत दिनांक ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहाला नांदगाव विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन यानिमित्ताने तळागाळातील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणुन घेत त्यांना उध्दव ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच शिवसैनिकांनी देखील या सप्ताहाचे व मशालीचे स्वागत केले अशी माहिती शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी दिली.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक ५ ते ११ ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. नांदगाव तालुका बरोबरच मालेगाव मधील जिल्हा परिषदेच्या अडीच गटामध्ये शिवसेनेच्या या ज्वलंत मशालीचा त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताह आयोजित करून देशाच्या आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आपण तमाम शिवसैनिकांनी त्याचबरोबर ग्रामस्थांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले. जिथे जिथे या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले ,त्या त्या ठिकाणी या सप्ताहाचे आणि मशालीचे जोरदार स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागात या सप्ताहाचे नागरिकांमध्ये असलेले उत्साह पाहून तमाम निष्ठावंत शिवसैनिकांचे मनोबल नक्कीच वाढले. या मार्गदर्शन तथा मशालीचे नेतृत्व करण्यासाठी नांदगाव तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, शिवसेना सह संपर्कप्रमुख प्रवीण नाईक शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद जिल्हा, समन्वयक सुनील भाऊ पाटील, शिवसेना जिल्हा विधी व न्याय अध्यक्ष ऍड.सुधाकर मोरे, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास भाबड, जिल्हा संघटक संजय कटारिया, नांदगाव विधानसभा संपर्कप्रमुख शिर्के सर नांदगाव विधानसभा संघटक संतोष जगताप शिवदूत राजाभाऊ आहेर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सोनज कर ताई शिवसेना उपजिल्हाप्रमुख समाधान देतकर गट प्रमुख जालिंदर शेलार मार्केट कमिटी डायरेक्टर बंडूभाऊ पगार चंदू वाघ समाधान हिरे जगदीश देवरे मुन्ना जाधव माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे, समाधान दैतकर, माजी नगरसेवक विजय मिश्रा, प्रमोद अण्णा पाचोरकर, लियाकत शेख, विनय आहेर, मनमाड शहर प्रमुख माधव शेलार नांदगाव तालुका प्रमुख श्रावण आढाव, युवा सेना उपजिल्हाअधिकारी आशिष घुगे, नांदगाव तालुका युवा सेना प्रमुख सनी फसाटे, युवा सेना प्रमुख इरफान शेख, महिला आघाडीच्या..कविताताई छाजेड, जयस्वाल भाभी, मुक्ताताई नलावडे, लीलाताई राऊत, माजी नगरसेविका सौ. मोरे ताई, किरण ताई शिंदे कविता परदेशी, निष्ठावंत शिवसैनिक तथा पदाधिकारी अनिल दराडे, प्रवीण धाकराव, छोटू राऊत, ज्ञानेश्वर नागपुरे, वसंत नागरे, गणेश सांगळे मनोज अंकुश, समाधान इप्पर, अथर्व मोरे, वसंत नागरे विवेक परदेशी, पंडित सानप समाधान हिरे काळू माळी नितीन राजपूत पप्पू परब केतन जाधव अतुल साबळे राहुल सांगळे पांडुरंग पांडुरंग राख राजू करकाळे सनी करकाळे सापनर अनिल रवींद्र इप्पर राजाभाऊ आहेर राजाभाऊ पवार, राकेशआहेरराव, पवन पवार, योगेश शर्मा, राजेंद्र (मामा) सांगळे, कयाम सय्यद, बबलू शेख राजू सांगळे, शहर सचिव जावेद मंसूरी अशोक सानप वाळूबा सानप दगू भाबड आदींनी प्रयत्न केले.


ग्रामिण भागातील निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे सोबत..!
भगवा सप्ताह अंतर्गत नांदगाव विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात दौरा आखण्यात आला या दौऱ्यात गावात बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांचे विचार सांगण्यात आले या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन ग्रामीण भागातील सर्व जेष्ठ शिवसैनिक हे उध्दव ठाकरे सोबत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेच्या प्रत्येक उमेदवाराना बहुमताने निवडून देण्याच निश्चित करण्यात आले.