साम्यवादी विचाराशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहणारा कॉम्रेड गमावला.
साम्यवादी विचाराशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहणारा कॉम्रेड गमावला.
जळकोट( उदगीर) विशेष प्रतिनिधी :- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय राज्य कार्यकारणी सदस्य व किसान सभेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव कॉम्रेड राजू पाटील यांचा स्मृतिशेष – शोकसभा कार्यक्रम साधना हॉटेल या ठिकाणी घेण्यात आली यावेळी अभिवादन करताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक कॉम्रेड किशोर ढमाले यांनी असे प्रतिपादन केले की साम्यवादी विचाराशी कृतीने एकनिष्ठ अखेरपर्यंत राहिलेला कॉम्रेड राजू पाटील यास आम्ही संघटनेने गमावलं याचे संघटनेला अतिशय दुःख झालेले असून ही निर्माण झालेली पोकळी लवकर भरून निघणे शक्य नाही असे प्रतिपादन केले.
या समृती -शेष शोकसभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर पटवारी हे होते तर यावेळी प्रमुख उपस्थितीत युक्रांत चे साथी रंगा राचुरे तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी, विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा अंजुम कादरी, शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव माधव बावगे, प्राध्यापक मारुती कसाब, बाबुराव माशाळकर, काँग्रेसचे युवा नेते आशिष पाटील राजूरकर, अजित शिंदे, निवृत्ती सांगवे, प्राध्यापक व्यंकट सूर्यवंशी ,राज्यसाहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुरकर ,शाहीर अंकुश सिंदगीकर,प्रमुख व्याख्याते सिद्धेश्वर लांडगे ,अहमद सरवर,एस .एस. पाटील, डॉक्टर संदीप सोनटक्के, सतीश नाईकवाडे, रेल्वे संघर्ष समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य मोतीलाल डोईजडे इत्यादी मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी अभिवादन करताना प्राध्यापक मनोहर पटवारी असे म्हणाले की महाराष्ट्रातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक सच्चा चळवळीतला कार्यकर्ता ज्यांनी शेतकरी ,शेतमजूर ,कामगार यांच्या प्रश्नासाठी शिबिरे, परिसंवाद ,मोर्चे, धरणे ,इत्यादी काढून अनेक मागण्या मंजूर करून घेतल्या तो लढवय्या कॉम्रेड राजू पाटील आपल्यातून अयोग्य वेळी निघून गेला असे प्रतिपादन केले.
युवकांचे साथी रंगाराचुरे यांनी अभिवादन करताना असे प्रतिपादन केले की दिलदार मनाचा रस्त्यावरील झुंजार कार्यकर्ता हरवला असे प्रतिपादन केलेयावेळी विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीचे संघटक कॉम्रेड किशोर ढमाले यांनी असे प्रतिपादन केले की कॉम्रेड राजू पाटील यांनी महाराष्ट्रातील अनेक मित्रपरिवार जोडलेला होता विविध सामाजिक संघटनेशी त्यांचा संबंध होता राज्य पातळीवरील एक नेतृत्व हरपले व त्यांची इच्छा असलेली मुखेड येथे विद्रोही साहित्य संमेलन घेण्यात यावे व त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखविला . व उदगीर येथे त्यांची आठवण म्हणून परिसंवाद कार्यक्रम चालू ठेवण्याचा मानस यावेळी संघटनेने केला