शिकावू मुख्याधिकारी यांच्या ढिसाळ कारभाराने मनमाड शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर गुरू निकाळे यांची तक्रार…!


शिकावू मुख्याधिकारी यांच्या ढिसाळ कारभाराने मनमाड शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर गुरू निकाळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार…!
मनमाड(अजहर शेख):- नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळख असलेल्या तसेच उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहराची लोकसंख्या तब्बल दीड लाखाच्या पुढे गेलेली आहे शहरातील लोकसंख्या बघता सफाई कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे जे कर्मचारी आहेत ते देखील आपले काम प्रामाणिकपणे करत नसल्याने तसेच पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी हे आपल्या कर्तव्यात कमी पडत असल्याने शहरातील नागरिकांची आरोग्य धोक्यात आले असून याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील पालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नांदगाव तालुका युवक अध्यक्ष गुरु कुमार निकाळे यांनी जिल्हाधिकारी जजल शर्मा यांच्याकडे तक्रार केली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी कोणती पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे
           
  निकाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून मनमाडची ओळख असून याठिकाणी मनमाड नगर परिषद ही ‘ब’ वर्गाची आहे. शहराची लोकसंख्या आज सुमारे दिड लाखाच्या आसपास आहे. मात्र शहरात आरोग्य व्यवस्थेची तीन तेरा चार बारा झाले असून शहरातील बऱ्याच भागात कचरा दिसून येतो याठिकाणी अधिकारी व कामगार यांच्यात कुठलाही समन्वय नाही मनमानी कारभार चालू आहे. त्यामुळे नागरीकांना आरोग्य सुविधा देण्यास नगरपालिका प्रशासन कमी पडत आहे. आरोग्य विभागाला कायमस्वरुपी आरोग्य निरीक्षक नाही एकाच अधिकारी वर अनेक विभागाच्या जबाबदाऱ्या टाकल्या जात आहे त्यामुळे त्यांना इतर विभागाचा अनुभव नसल्याने कामात दिरंगाई होत आहे, घंटा गाड्या देखील नियमित व वेळेवर येत नाही त्यामुळे कचरा रस्त्यावर फेकला जातो आरोग्याचा प्रश्न मोठ्या ऐरणीवर आला आहे त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेकांना आरोग्य समस्या भेडसावत मलेरिया विभाग देखील सुस्त झाला आहे यात देखील सुसूत्रता नाही केवळ टेबल वर्क केले जाते शहरात प्रत्यक्षात ठिकठिकाणी औषध व धूर फवारणी केली जात नाही केवळ कुठल्याही ठिकाणी औषध मारण्याचे फोटोसेशन केले जाते व त्याचे फोटो काढून प्रशासनाला पाठविले जाते आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार याठिकाणी होत आहे. इतर ठिकाणी मात्र आरोग्याची ऐशी तैशी झालेली दिसून येते काम करुन या सर्व प्रकारास शिकावू मुख्याधिकारी जबाबदार आहे.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पाकिजा कॉर्नर इंदौर पुणे हायवे वरील पथदिप बंद अस्थेत आहे सायंकाळच्या वेळेस पुलालगत अंधाराचे साम्राज्य असते तसेच पुलाच्या कोपऱ्यावर मासमच्छी यांचे वेस्टज आणून टाकतात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे असतात रात्रीच्या वेळेस येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना जीव मुठीत घेऊव यावे जावे लागते. शहरात अनाधिकृत अतिक्रमणाच्या तक्रारी असून अतिक्रमण धारकांना पाठीशी घातले जाते अशा एक ना अनेक कारणांनी शहरात समस्यां वाढत असून यास केवळ प्रशासनाच्या ढिसाळपणाच कारणीभूत आहे. शिवाकू मुख्याधिकारी यांची प्रशासनावर कंट्रोल नाही त्यामुळे अधिकारी मनमानी करतात त्यामुळे मनमाड शहरातील जनता नगरपालिकेच्या बेशीस्त प्रशासकीय कामामुळे त्रस्त झाली असून नागरी सुविधांपासून वंचित आहे या सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी  असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!