मनमाड महाविद्यालयात रासेयो तर्फे सायबर सिक्युरिटी यावर जनजागृती


मनमाड महाविद्यालयात रासेयो तर्फे सायबर सिक्युरिटी यावर जनजागृती

Advertisement

मनमाड(अजहर शेख):- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत “सायबर सिक्युरिटी” या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये उपप्राचार्य डॉ बी एस देसले व पर्यवेक्षक प्रा.डी.व्ही सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज प्रत्येकाला आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये ‘ सुरक्षित व्यवहार’ होईल की नाही ही समस्या आहे. आज ऑनलाइन पेमेंट करताना, इंटरनेट सर्चिंग, आपले गुगल अकाउंट या सर्वांमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या असतात. त्यामधील कोणत्या टर्म्स अँड कंडिशन स्वीकाराव्यात किंवा ना स्वीकाराव्यात यासंबंधीची सविस्तर माहिती मान्यवरांनी उपस्थितांसमोर मांडली. व्हाट्सअप, फेसबुक यावर कोणत्या पोस्ट कराव्यात कोणत्या नाही कराव्यात. यासंबंधीची ही माहिती मान्यवरांनी विस्तृतपणे सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार रा से यो कार्यक्रमाधिकारी डॉ पवनसिंग परदेशी तर सूत्रसंचालन प्रा सोमनाथ पावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा शरद वाघ, डॉ. सुनील घुगे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!