नांदगावला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा..
नांदगाव ( महेश पेवाल ) : जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने विर बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे, खोज्या नाईक आदी आदिवासी क्रांतिकारक , आदिवासी समाजसेवक, समाजासाठी महान कार्य करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करत मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस शहरात साजरा करण्यात आला.
नांदगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली याप्रसंगी समाजसेविका अंजुम
कांदे यांनी आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शहरातील मुख्य मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. वाद्याच्या तालावर नाचत आदिवासी बांधवांचा प्रचंड उत्साह ओसंडून वाहत होता. दरम्यान सकाळी बाईक रॅलीत तरुण रॅलीत सहभागी होते.
यावेळी अबालवृद्ध , तरुण , तरुणी सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.