मनमाडला भर पावसात सिटुचे आंदोलन, 17 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण…!
मनमाडला भर पावसात सिटुचे आंदोलन, 17 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण…!
मनमाड(अजहर शेख):- वारसा हक्क लागू व्हावा वारसा हक्काचे प्रलंबित प्रकरण मार्गी लावावे पदोन्नती द्यावी यासह नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिटु संघटनेच्या वतीने आज मनमाड नगर पालिकेच्या कार्यलायावर धरणे आंदोलन करण्यात आले. सिटु संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ रामदास पगारे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले आझाद हॉल मधील सिटु कार्यालयाच्या ऑफीस मधून मोर्चा काढत पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सिटु संघटनेचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.