व्ही जे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवल्या इको फ्रेंडली राख्या
नांदगाव ( महेश पेवाल ):- नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव येथे जेष्ठ कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थीनींनी इकोफ्रेण्डली राख्या कार्यशाळेत तयार केल्या. टाकावू वस्तू पासून ३५० आकर्षक राख्या विद्यार्थीनींनी तयार केल्या. या राख्या भारतीय सैन्यदलातील जवान , पोलिस, एसटी बस चालक – वाहक, विद्यार्थ्यांचे रिक्षा – जीप चालक, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी यांना औक्षण करून बांधण्यात येणार आहे. या उपक्रमाला सहकार्य विजय चव्हाण, ज्ञानेश्वर डंबाळे, शशिकांत खांडवी, भास्कर मधे, प्रविण अहिरे यांनी केले. उपक्रमाचे कौतुक शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक खंडू खालकर, पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव यांनी केले.