कांद्यासह शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी खासदारांचे आंदोलन खासदार भास्कर भगरे खासदार राजाभाऊ वाजे यांचेसह विरोधी खासदार सहभागी
कांद्यासह शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी खासदारांचे आंदोलन खासदार भास्कर भगरे खासदार राजाभाऊ वाजे यांचेसह विरोधी खासदार सहभागी
नवी दिल्ली( मनमाड सम्राट वृत्तसेवा):- कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी व नाफेड कडून कांदा खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर कांद्याला 35 रुपये किलो हमी भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राईस एम एस पी मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क आकारू नये जाचक अटी शर्ती रद्द कराव्या कांद्याला 35 रू.किलो हमी भाव द्यावा.इतर शेतमालाला ही एम.एस.पी.द्यावी .दुधाचे भाव वाढविण्याबाबत उपाययोजना व्हाव्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्या आदी मागण्या करण्यात आल्या.यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. दिंडोरी चे खासदार भास्कर भगरे,नाशिक चे खासदार राजाभाऊ वाजे,अहिल्यानगर चे खासदार निलेश लंके, म्हाडा चे खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील , काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच या आंदोलनामध्ये टीडीपी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनी ही सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले.