नांदगावला गाड्याना थांबा न दिल्यास जनआंदोलन छेडणार प्रवासी संघटनेचा ईशारा…!


नांदगाव ( महेश पेवाल ): रेल्वे प्रशासनाने करोना काळापासून ते आजपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकावरील झेलम व शालिमार एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पुर्ववत करण्यात यावे.तसेच आमरावती -पुणे या गाडीचा थांबा मिळावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.करोना काळापासून ते आजपर्यंत झेलम व शालीमार एक्स्प्रेसचे थांबे रद्द करण्यात आल्याने पुणे, अहमदनगर कोपरगाव, (शिर्डी),तसेच दिल्ली, जम्मू काश्मीर जाण्यासाठी रेल्वे गाडी नसल्याने मोठी गैरसोय निर्माण आहे.नांदगाव तालुक्यातील जम्मू काश्मीर सरहद्दीवर जवानांची संख्या १००० हजार असल्याने रात्री उशिरापर्यंत मनमाड रेल्वे स्थानकावर ये-जा करत असतात. ५००० हून अधिक भाविक नांदगाव तालुक्यातून अमरनाथ, यात्रा करिता नियमित जात असतात त्यांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. झेलम,शालिमार व आमरावती -पुणे एक्स्प्रेसचा थांबा मिळवण्यासाठी नांदगावकरकरांनी मोठा संघर्ष करावा लागत आहे. झेलम, आमरावती -पुणे व शालीमार एक्सप्रेस गाड्यांचे थांबे चाळीसगांव ,जळगांव ,पाचोरा, या तहसील कार्यालय क्षेत्रामध्ये थांबे देण्यात आले आहे. मात्र.. नांदगाव तहसील क्षेत्र असल्याने थांबे देण्याची गरज असताना या रेल्वे गाड्यांचे थांबा दिलेला नाही. नांदगाव शहर व ग्रामीण भागातील जनतेची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. झेलम एक्स्प्रेसला बसण्यासाठी व उतरण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावर जावे लागते.त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.नांदगाव रेल्वे स्थानकावर झेलम,शालीमार व आमरावती -पुणे या रेल्वे गाड्यांचे थांबे मिळावे अन्यथा आगामी काळात जन आंदोलन छेडण्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बबलू सैय्यद यांनी दिला आहे.

Advertisement

नांदगाव रेल्वे स्थानकावर झेलम,शालीमार, आमरावती -पुणे एक्स्प्रेस या तिन्ही रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी खासदार भास्कर भगरे यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
बबलू सैय्यद, अध्यक्ष ,रेल्वे प्रवासी संघटना,नांदगाव.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!