सीटूच्या वतीने प्रलंबित मागण्या करीता ९ ऑगस्ट क्रांतिदिनी
सीटूच्या वतीने प्रलंबित मागण्या करीता ९ ऑगस्ट क्रांतिदिनी गेट निदर्शने…!
मनमाड(आवेश कुरेशी):- सीटूच्या वतीने प्रलंबित मागण्या करीता ९ ऑगस्ट क्रांतिदिनी २०२४ रोजी एक दिवसीय गेट निदर्शने धरणे आंदोलन व २६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रलंबित मागण्यांसाठी ३५ कामगार आमरण उपोषण करणार आहे मनमाड नगर परिषदेतील सीटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने गेल्या २ ते ३ वर्षांपासून मनमाड नगर परिषदेतील कामगारांच्या प्रमुख प्रलंबित मागण्यांकरीता एक दिवसाचे निदर्शने व आंदोलन जिल्हा प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय घेण्यात यावा या करीता २६ ऑगस्ट २०२४ रोजी पासुन सकाळी ११ वाजता मनमाड नगर परिषद कार्यालयाखाली खालील प्रमाणे प्रलंबित मागण्यांकरीता ३५ अन्याय ग्रस्त कामगार अनुकंपा वारसाहक्क पदोन्नती.इ आपल्या हक्का पासुन वंचित राहीलेले ३५ कामगार अमरण उपोषणास बसणार आहेत. यात प्रामुख्याने मयत कामगारांच्या वारसदार यांच्या वाढत्या वयाचा विचार करावा तसेच कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असून त्यांना मा.जिल्हाधिकारी सो यांच्या सेवाज्येष्ठते यादी नुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेण्यात यावे ,अश्वसित प्रगती योजना.१ ली व दुसरी कालबद्ध पदोन्नती. वशिला पध्दतीने सेवाज्येष्ठता यादी डावलून काहीना लाभ देण्यात आला परंतु अद्याप बऱ्याच कामगारांना पहिली व दुसरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही तसेच सफाई कामगारांनाही लागु करुन आर्थिक लाभ देण्यात यावा. तसेच इतर विभागातील वर्ग ३ वर्ग ४ च्या कर्मचारी यांना अद्याप पावेतो लागु करण्यात आला नाही. त्यांना त्वरित विनामूल्य लागु करण्यात यावा औरंगाबाद हायकोर्टाने नुकताच दिनांक २४/६/२०२४ रोजी दिलेल्या लाड पागे समितीच्या निकाला प्रमाणे तसेच मा.आयुक्त तथा संचालक नगर पालिका प्रशासन संचालनालय बेलापूर मुंबई यांच्या न.प.प्र.सा.२०२४/लापास/प्र.क्र.५७/कक्ष-४ दिनांक ३०/७/२०२४ जा.क्र ४४०१ परिपत्रका प्रमाणे लाड पागे समितीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत च्या आदेशा नुसार वारसाहक्क प्रकरणे विनामूल्य मार्गी लावण्यात यावेत.मनमाड नगर परिषद प्रशासन कामगार हिताचे निर्णय न घेणे संबधित विभागाच्या मनमानी कारभाराला आळा बसेल अशी कारवाई व्हावी व S.C./S.T.मागासवर्गीय सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात यावी.व त्या प्रमाणे बढती पदोन्नती (प्रमोशन ) देण्यात यावी. मनमाड न.प.अस्थापना विभाग हे कामगार हीताच्या निर्णयाची माहीती महाराष्ट्र शासनाला.मा.संचालक कार्यालय जिल्हा प्रशासनाला खरी व परिपूर्ण देत नाही.उदा मागासवर्गीय रिक्त जागा/रिक्त जागा.कामगारांच्या तारखेचा घोळ इत्यादीं विषयाबाबत आस्थापना विभागातील काही महाभाग चुकीची कामे करित असतात त्यांची तेथून बदली करण्यात यावी व त्यांच्या जागेवर केडर च्या अस्थापना विभाग प्रमुख म्हणून कायम स्वरुपी नेमणूक करण्यात यावी. मनमाड नगर परिषद ही नाशिक जिल्ह्यातील ची मोठी नगर परिषद असून त्या नगरपरिषदेत गेल्या २ ते ३ वर्षांपासून पुर्ण वेळ (प्रमुख) म्हणून मुख्य आरोग्य निरीक्षक.अस्थापना निरिक्षक.पाणी पुरवठा इंजिनिअर.लेखापाल.कर अधिक्षक. इलेक्ट्रिक इंजिनिअर. इत्यादी पदावर कामाच्या सोईनुसार फुकट फौजदार कामगार करीत असुन त्या विभागाला पुर्ण वेळ संवर्ग च्या सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे निवेदनावर कॉसंतोष वानखेडे (अध्यक्ष)कॉ हाजी असलम शेख (कार्याध्यक्ष) सुरज चावरिया (उपाध्यक्ष ) कॉ उमेश चुनियान (उपाध्यक्ष) कॉ.रविंद्र वाघले (उपाध्यक्ष)कॉ.रोहित शिंदे (उपाध्यक्ष)कॉ.रामदास पगारे(जन.सेक्रेटरी ) कॉ.अमोल बागुल (खजिनदार) यासह इतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.