माजी नगरसेविकेच्या मुलाच्या हत्येने हादरलं मनमाड शहर…जुन्या भांडणाची कुरापात काढून टोळक्याने केली माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या…. शहरात तणावाची परिस्थिती


माजी नगरसेविकेच्या मुलाच्या हत्येने हादरलं मनमाड शहर…जुन्या भांडणाची कुरापात काढून टोळक्याने केली माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या…. शहरात तणावाची परिस्थिती

मनमाड(अजहर शेख)  :- माजी नगरसेविका नूतन देविदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरलं असून जुन्या भांडणाची कुरापात काढून टोळक्याने या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली असून शुभम देविदास पगारे वय( २७ ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री शुभम घरी जात असताना शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने धारदार हत्याराने वार केले त्यात गंभीर जखमी झाला होता त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपीना अटक करण्याची मागणीसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले.या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक 3/8/2024 रोजी अकरा वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जुने भांडणाच्या कारणांमुळे मयत शुभम देविदास पगारे वय वर्षे 27 व दादु बाळासाहेब सुदगे व इतर तीन अनोळखी ईसम यांच्यात तुंबळ हाणामारी झाली यात मयत शुभम देविदास पगारे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येथे उपचार चालू असताना मयत झाला आहे दादु बाळासाहेब सुदगे यांच्या वर मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्य उपचार चालू आहे

Advertisement

पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर शुभम वाचला असता….?

साधारण दीड महिन्या पूर्वी शुभम व दादू यांच्यात वाद झाला होता त्यावेळी देखील दोघांनी एकमेकांना मारझोड केली होती प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते मात्र नंतर हे आपापसात मिटवुन घेण्यात आले तेव्हा जर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता तर आज शुभमचा जीव वाचला असता अशी शहरात चर्चा सुरू आहे.

भर पावसात मृतदेह घेऊन आरोपींना अटक करण्यासाठी निदर्शने..!

काल रात्री शुभमचा खूण झाला या घटनेतील मुख्य आरोपी हा स्वतः जखमी असल्याने तो मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे मात्र त्याच्यासोबत असणारे इतर आरोपी फरार आहेत त्यात पोलिसांनी आम्ही तपास करून आरोपींना अटक करू असे मृत शुभमच्या मामा व नातेवाईकांना सांगितले यामुळे संतप्त नातेवाईकांनी भरपावसात मृतदेह पोलीस ठाण्यात नेला व याठिकाणी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली तब्बल साडेतीन तासानंतर ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नातेवाईकाना समजावून सांगितले व दोन दिवसांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आला.

विक्रम देशमाने व  अनिकेत भारती यांच्या मध्यस्थीनंतर अंत्यसंस्कार…!

नांदगाव तालुक्यातील नांदगाव व मनमाड या दोन्ही पोलीस ठाण्यात खोट्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे याही घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्यात येईल असा आरोप शुभम चे मामा विलास कटारे यांनी केला यानंतर स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सर्व नातेवाईकांना समजावून सांगितले व दोन दिवसांत सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह घरी नेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक तयार झाले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!