नांदगाव पोलिसांच्या नाकाखाली चोरट्यांनी मारला डल्ला…? पोस्ट ऑफिससह इतर ठिकाणी धाडसी चोरी…!


नांदगाव पोलिसांच्या नाकाखाली चोरट्यांनी मारला डल्ला…?

पोस्ट ऑफिससह इतर ठिकाणी धाडसी चोरी…!

नांदगाव (महेश पेवाल)  : शहरातील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भारतीय डाक विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडत चोरट्यांनीं १लाख ५ हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आला असून शहरात अन्य एका ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदगाव शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर तसेच वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या भारतीय डाक विभागाचे कार्यालय असून शनिवारी सकाळी या कार्यालयाचा दरवाजा उघडा दिसल्याने नागरीकांनी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली.

Advertisement

घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक सुनील बढे, पो.ह.अनिल जाधव, धर्मराज अलगट पथकासह दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर धनराज गंगाराम सोनवणे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांत अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी भेट दिली.
दरम्यान नांदगाव शहरातील गढी भागातील घरात कोणी नसल्याच्या फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून
सुनील बाबुलाल पांडे यांच्या घरातील सोने,चांदी, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून
नेला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!