वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे ही काळजी गरज ; राजेंद्र पवार
वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे ही काळजी गरज ; राजेंद्र पवार
मनमाड (अजहर शेख):- वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असुन प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या घर परिसरात एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत नागापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्याचे महत्व पटवुन सांगितले.
२७ जूलै हा दिवस शिक्षण सप्ताह म्हणून साजरा केला जातो या दिनाच्या निमित्ताने.जि.प.प्रा.शा.
नागापूर येथे नागापूर ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जास्तीतजास्त वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी नागापूर ग्रामपंचायत सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याचे मत सरपंच राजेंद्र पवार यांनी सांगितले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाळासाहेब उगले.मुख्याध्यापिका पाटिल मॅडम व नाईकवाडे सर ,पवार सर ,राजपूत मॅडम सीमा पाटील मॅडम उपस्थित होते.