मनमाडच्या कार्यकर्त्यांच  पुरोगामी,आंबेडकरी विचारांचं चिलखत घालुन पांढरपेशी कृत्य…?


मनमाडच्या कार्यकर्त्यांच  पुरोगामी,आंबेडकरी विचारांचं चिलखत घालुन पांढरपेशी कृत्य…!

मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड शहरातील शिव फुले शाहु आंबेडकर यांच्यासह पुरोगामी विचारांचा वारसा जोपासण्याच्या गोष्टी करणारे केवळ पुरोगामी व आंबेडकरी विचारांचे चिलखत घालून मिरवत असुन त्यांच्याकडून पांढरपेशी कृत्य घडताना दिसत आहे.एखाद्या धनदांडग्याच्या (मग तो आपल्या विचारांच्या विरोधात का असेना) त्याच्या अंत्यसंस्कार पासून ते त्याच 10 व 13 व करेपर्यंत दुःखात सहभागी होणारे व स्वतःला पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीत काम करणारे म्हणून मिरवणारे शहरातील शिव फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील खंदा कार्यकर्ता व लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्रोही कार्यकर्ता यशवंत बागुल याच्या शोकसभेला आवर्जून अनुपस्थितीत राहिले आपलं संबंध आयुष्य पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या आशा सच्चा कार्यकर्त्यांच्या शोकसभेला टाळणे म्हणजे एकप्रकारे पुरोगामी विचारांच चिलखत घालून पांढरपेशी कृत्य करणे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
                    अंगात नेहरू शर्ट पायजमा जॅकेट व गळ्यात शबनम पिशवी अटकवलेला यशवंत बागुल सर्व मनमाडला परिचित आहे त्याच्या ठाम भूमिका घेण्यासाठी देखील तो प्रसिद्ध होता,आपलं संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचारांचा वारसा जोपासण्यासाठी खर्ची करणारा व आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आंबेडकरी विद्रोही चळवळ पुढे नेणारा कार्यकर्ता यशवंत बागुलचे आकस्मिक निधन झाले त्याच्या जाण्याने आंबेडकर चळवळ तसेच विद्रोही चळवळ पोरकी झाली त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीतच नाशिक येवला नांदगाव यासह मनमाड येथील पुरोगामी विचारांच चिलखत घातलेल्या अनेकांनी यशवंतची शोकसभा घ्यायची कुठे घ्यायची कोणाला बोलवायचं कोणाला अध्यक्ष करायचं आशा गप्पा ठोकल्या मात्र त्यांनी तर शोकसभा घेतलीच नाही मात्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीने आयोजित केलेल्या शोकसभेला देखील यांनी अनुपस्थितीत राहून आम्ही केवळ पुरोगामी विचारांच चिलखत घातलेले आहे आम्ही मुळात पांढरपेशी लोक आहोत हे सिद्ध करून दिले शिव फुले शाहु आंबेडकर यांचा वापर आम्ही केवळ आमच्या सोयीनुसार करतो हेही या माध्यमातून सिद्ध करून दिले.मुळात मनमाड शहरात लोकशाहीर कॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी आपल सर्व अर्पण करून कॉ अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सचिव पद स्वीकारून मातंग समाजाच्याही पुढे राहुन पुतळा बसविण्यात यावा यासाठी लढा दिला विविध आंदोलन केली अनेकदा गुन्हे दाखल करून घेतले त्या स्मारक समितीच्या एकही सदस्यांनी यशवंत बागुल यांच्या शोकसभेला हजेरी लावली नाही यासारख दुर्दैव अजुन काय असू शकते हाही सवाल उपस्थित केला जात आहे.यशवंत बागुल हा हाडांमासाचा आणि लढाऊ कार्यकर्ता होता तो कायम आंदोलन करण्यासाठी किंवा कोणता कार्यक्रम करण्यासाठी पुढे असायचा व लोक प्रतिसाद देतील का अस म्हटल्यावर तो म्हणायचा भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तलवारीच्या टोक न्यारेच असते आणि आहे त्या कार्यकर्त्यांना हिंमत देऊन आंदोलन असो वा कार्यक्रम पार पाडायचा यामुळे त्याला मानणारा वर्ग हा आवर्जून उपस्थित राहिला मात्र वाईट याच गोष्टीच वाटलं की स्वतःला पुरोगामी विचारांचा वारसदार म्हणवणाऱ्या अनेकांनी केवळ पुरोगामी विचारांच चिलखत घातले आहे आणि त्यांच कृत्य आजही पांढरपेशी पणाचे आहे हे सत्य जनतेसमोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!