मनमाडला एफसीआय ठेकेदारच्या मनमानी कारभाराविरोधात लाक्षणिक उपोषण
मनमाडला एफसीआय ठेकेदारच्या मनमानी कारभाराविरोधात लाक्षणिक उपोषण
मनमाड(आवेश शेख):-येथील भारतीय अन्न महामंडळातील ठेकेदार मनमानी करीत असल्याच्या विरोधात एफसीआय मध्ये काम करणारे कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आज(बुधवार)पासून लक्षणिक उपोषण सुरु केले आहे. कामगारांच्या आंदोलनाला शहरातील वेगवेगळे राजकीय पक्ष आणि संघटनानी पाठिंबा दिला आहे.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मत आंदोलनकर्त्यानी व्यक्त केले आहे.
कामगारांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि मनमाड शहरातील आशिया खंडातील सर्वात मोठी खाद्य गोदाम आहेत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून 140 पेक्ष्या जास्त कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत मात्र त्यांना ठेकेदारकडून मनमानी पध्दतीने वागणूक दिली जाते त्यांना किमान वेतन दिले जात नाही,नियमित 26 दिवस काम दिले जात नाही, मेडिकल सुविधा नाही तसेच काम करीत असतांना कुठलेही सुरक्षित साधने दिली जात नाही याशिवाय मेडिकल इन्शुरन्स नाही कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने आणि याबाबत अनेकदा तक्रारी करुनही ठेकेदार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे या मागण्यासाठी ठेकादरा सोबत एफ.सी.आय.च्या अधिकाऱ्यांना देखील अनेकदा निवेदने देण्यात आली मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे आमच्यावर होत असलेल्या अन्याय विरुद्ध विक्की पगारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत असल्याचे म्हटले आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करू व यास सर्वस्वी सबंधित ठेकेदार व एफसीआय कर्मचारी जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला आहे.
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन…!आम्ही कंत्राटी पध्दतीने जरी काम करत असलो तरी किमान समान कायद्याच्या अंतर्गत आम्हाला 26 दिवस काम मिळायला हवे याशिवाय समान वेतन मिळायला हवे मात्र ठेकेदार आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत नाही याशिवाय त्यांच्याबाबत तक्रारी केल्या तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देतो आज आम्ही लक्षणिक उपोषण केले आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी ठेकेदार अधिकारी जबाबदार असेल.-विक्की पगारे ,आंदोलक तरुण