मनमाड पालिकेच्या निषेधार्थ तोंडाला काळी पट्टी बांधुन निषेध आंदोलन…! अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी केले आंदोलन…
मनमाड पालिकेच्या निषेधार्थ तोंडाला काळी पट्टी बांधुन निषेध आंदोलन…! अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी केले आंदोलन…
मनमाड(अजहर शेख):- शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या महिनाभर आधीपासूनच पत्र देऊनही मुख्याधिकारी कारवाई करत नसल्याच्या विरोधात शहरातील भीमसैनिकाच्या वतीने पालिकेच्या विरुद्ध हाताची घडी तोंडाला काळी पट्टी आंदोलन सुरू केले आहे.
मनमाड नगर पालिकेच्या हद्दीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यालगत परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असुन या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत हे अतिक्रमण तात्काळ काढावे यासाठी आम्ही महिन्याभरापासून आंदोलन करत असुन मुख्याधिकारी हे गोरगरीब जनतेचे अतिक्रमण काढत आहे मात्र अवैध धंदे सुरू असलेले अतिक्रमण काढत नाही या विरुद्ध आम्ही हातची घडी व तोंडाला काळी पट्टी आंदोलन करत असून जोपर्यंत अतिक्रमण हटवत नाही तोपर्यंत आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.