शिरपूर तालुक्यातील २७९ शाळांतील २५५९९ विद्यार्थी गणेशाविनाच
शिरपूर तालुक्यातील २७९ शाळांतील २५५९९ विद्यार्थी गणेशाविनाच
त-हाडी [महेंद्र खोंडे ] शैक्षणिक वर्षे २०२४-२५ साठी सोमवार १५ जुन पासून प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या. इयत्ता पहिली ते आठवी च्या वर्गात २५५९९ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. तालुक्यातील ,शिरपूरसह भटाणे,अर्थे, विखरण ,वाडी, जातोडा, तरडी, उमरदा,सांगवी पळासनेर, आंबे, भोईटी, करवंद होळनाथे, बोराडी ,कोडीद,दहीवद वाठोडा, सावळदे हे १९ केंद्र असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या २७९ शाळा असून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या गणवेशातच यंदा शाळेत दाखल व्हावे लागले. शाळा सुरु होऊन आज जवळपास एक महिना उलटून गेले असताना देखील अद्यापही विद्यार्थ्यांना नविन गणवेश न मिळाल्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७९ शाळेतील २५५९९ विद्यार्थी नविन गणेशाच्या प्रतिक्षेत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मोठा गाजावाजा करत प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला अनेक गावातून बैलगाडीतून ट्रॅक्टर मधून प्रभात फेरी काढून उत्सव साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेची जोडी निर्माण व्हावे म्हणून पहिल्या दिवशी शालेय पोषण आहार बरोबर गोड पदार्थ ही देण्यात आले प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले इयत्ता पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला तसेच शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले प्रत्येक वर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तके वाटप केले जात होते परंतु यंदा मात्र गणवेश वगळून पाट्या पुस्तके वाटप करण्यात आले शिरपूर तालुक्यातील २७९ जिल्हा परिषद शाळेतील २५५९९ विद्यार्थी शालेय गणवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
दोन पैकी एकही नाही..
पाञ विद्यार्थी २५५९९ आहेत. यांना एक गणवेश स्काऊट गाईडचा आणि एक शाळेचा नियमीत गणवेश असे दोन गणवेश मिळणार आहेत. याला किती दिवस लागतील हे सांगता येत नसल्याने याबात पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. दोन दोन गणवेश मिळणार असले तरी त्यातील एकाचाही पत्ता नसल्याने पालक संताप व्यक्त करत आहेत. लवकरात लवकर गणवेश मिळावा, अशी मागणी आहे.
गेल्या वर्षीच्या गणवेशाच होतोय विद्यार्थ्यांकडून यंदाही वापर…
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २७९ शाळा असून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गत वर्षाच्या गणवेशातच यंदा शाळेत दाखल व्हावे लागले शाळा सुरू होऊन आज जवळपास एक महिना उलटून गेले असतानाही मुलांना जुन्या गणवेशात शाळेत जावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कमी झाला आहे तर पालक वारंवार शिक्षकांना विचारात असून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
१५ ऑगस्ट पर्यंत मिळेल का?
शाळेच्या पहिल्या दिवशी मोठा गाजावाजा करत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला अनेक गावातून बैलगाडीतून ट्रॅक्टर मधून प्रभात फेरीकडून उत्सव साजरा करण्यात आला.मात्र विद्यार्थ्यांना लागणारा महत्त्वाचा गणवेश मात्र वितरित झाले नाही पुढे १५ ऑगस्ट तोंडावर आहे त्याची तयारी करेपर्यंत तर गणवेशाचा प्रश्न सुटणार की नाही हा एक प्रश्न आहे.
बचत गटांना कापड प्राप्त झाले आहे?
शिरपूर तालुक्यातील २७९ जिल्हा परिषदेच्या शाळा असून गणवेश पात्र विद्यार्थी २५५९९ आहेत. यांना एक गणवेश स्काऊट गाईडचा आणि एक शाळेचा नियमीत गणवेश असे दोन गणवेश मिळणार आहेत. दोन दिवसांपूर्वी गणवेशाचे कापड कटाई करून बचत गटांना प्राप्त झाले आहे परंतू सद्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक बुट आणि दोन पायमोजे दिले जाणार आहेत. याचे बजेट आले नाही. बचत गटाकडून गणवेश शिवून झालं की वाटप होईल .
गणेश सुरवडकर
गट शिक्षणाधिकारी शिरपूर