शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ;पाच महिन्यांपासून मानधन थकीत
शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ;पाच महिन्यांपासून मानधन थकीत
शिरपूर(महेंद्र खोंडे):- एप्रिल 2024 पासून पोलीस पाटलांचं मानधन हे 15 हजार रुपये झाले आहे. आधी हेच मानधन 6 हजार 500 रूपये इतके होतेशिरपूर:-राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे शिरपूर तालुक्यातील व राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील सहा महिन्यांपासून ‘बिन पगारी, फुल अधिकारी बोलण्याची वेळ पोलीस पाटलांवर आलीय.फेब्रुवारीपासूनचं पोलीस पाटलांचं मानधन थकीत आहे. एप्रिल 2024 पासून पोलीस पाटलांचं मानधन हे 15 हजार रुपये झाले आहे. आधी हेच मानधन 6500 रूपये इतके होते. मात्र काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हेच मानधन दुप्पट केले आहे. असे असले तरी राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून थकीत असल्याने पोलीस पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागतो आहे.
पाच महिन्यांपासून पोलीस पाटलांचं मानधन थकीत
राज्यातल्या गाव खेड्यात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील हे एक महत्वाचे पद असून प्रथमिक पातळीवर पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात. राज्यात सध्या घडीला एकूण 37 हजार पोलीस पाटील आहेत. तर दुसरीकडे जवळपास 8 हजार पदं रिक्त असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस पाटलांचे गेल्या पाच महिन्यांचे प्रत्येकी 58 हजार अडकलेले असल्याने पोलीस पाटील मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकार नेमकं कधी वेतन देणार याची पोलीस पाटलांना प्रतिक्षा लागली आहे.