होलार समाज मुख्यमंत्री शिंदेची गाडी आडवणार…?
समाज अतिशय उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित व प्रचंड मागासलेला आहे. या समाजाच्या प्रशासनाला व समाजाला महाराष्ट्रामध्ये आज अखेर कोणत्याही सरकारने न्याय दिला नाही. म्हणून या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व होलार समाजाचे सामाजिक प्रश्नांसंबंधी गाऱ्हाणे मांडण्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने खालील मागण्यांसाठी दि. १७/२०२४ रोजी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. सदरचे आंदोलन भारतीय संविधानातील सनद शीर मार्गाने करण्यात येणार आहे. याची आपण नोंद घ्यावी. तसेच होणाऱ्या सर्व परिणामांना आपण व आपले प्रशासन जबाबदार रा- हील असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागण्या- होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी, होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापित करावे. सदरचे निवेदन तहसिलदार नांदगाव यांना देण्यात आले.
सदरचे निवेदन राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिल जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. जावीर, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार, प्रदेशाध्यक्ष रणजीत ऐवळे, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ. रेखा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले असून निवेदनावर भगवान सोनवणे, विठ्ठल जाधव, भाऊसाहेब सोनवणे, सुनिल जाधव, रावस साहेब सोनवणे, बाली सोनवणे.युवराज सोनवणे, अशोक जाधव, उमेश केंगार, रेखा शेलार, वाल्मीक कोळेकर, बाळू शेलार, नितीन सोनवणे, अंबादास खांडेकर, गणेश हातेकर, सर्वेश्वर हातेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.