लाडकी बहिण .. लबाडकीची योजना न ठरावी मुख्यमंत्री साहेब एक बहिण मायेची तर दुसरी भटकंतीची बहीण वाऱ्यावर नसावी..!


लाडकी बहिण .. लबाडकीची योजना न ठरावी मुख्यमंत्री साहेब एक बहिण मायेची तर दुसरी भटकंतीची बहीण वाऱ्यावर नसावी..!

मनमाड(आमिन शेख):- राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना अमलात आणली या योजनेसाठी सुरुवातीला अनेक किचकट अटी लावण्यात आल्या होत्या या अटी अतिशय जाचक असल्याचे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात बदल करून अनेक जाचक असणारे नियम व अटी शिथिल केल्या व या योजनेची मुदत देखील वाढवली मात्र या योजना सर्वच लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल राज्य सरकारने घेतली नसल्याने लाडकी बहीण योजना लबाडकीची ठरू नये असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे याचे कारण असे की धनगर समाजातील कुटुंब हे मेंढपाळ व्यवसाय करताना फिरस्तीवर असते यांच्यासह अजून इतर देखील भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांची देखील पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरू असते या महिलांना ही योजना सुरू झाली हे सध्या माहिती नाही तर या महिला कागदपत्रे जमा कधी करतील व या योजनेचा लाभ त्यांना कधी मिळेल असा सवाल उपस्थित केला जात आहे यामुळे राज्य सरकारने भटकंती करणाऱ्या महिलांना देखील ही योजना कशी पुरवता येईल याबाबत उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

Advertisement


राज्यातील सर्व महिला माझ्या बहिणी आहेत आणि त्यांच्यासाठी मी योजना सुरू केली असे विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले त्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली ज्या दिवशी घोषणा झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यातील लाडक्या बहिणींची कागदपत्रांची जुळवाजुळ करण्यासाठी धावपळ सुरू झाली या धावपळीत महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले यात सर्वात जास्त त्रास महिलांना झाला येवला तालुक्यातील एक महिला तर या कागदपत्राच्या गडबडीत अपघातात मृत्युमुखी पडली तर अनेक ठिकाणी महिलांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला सेतू कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी तसेच ऑनलाईन सर्विस सेंटर यांनी देखील महिलांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणा करून सांगितले की एकही रुपया घेतला अशा सेंटरवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत काही तक्रार असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन देखील राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे मुळात ही योजना राज्यातील 21 ते 65 वर्ष वय असणाऱ्या महिलांसाठी लागू करण्यात आली आहे यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमात बसणाऱ्या सर्व महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यावर जमा होणार आहे हा निर्णय स्वागत करणारा असला तरी धनगर समाजासह इतर भटक्या विमुक्त जातीच्या महिलांना अशी काही योजना सुरू झाली असून या योजनेसाठी काय करायचे हे देखील माहिती नाही अशा महिलांसाठी राज्य सरकारने उपयोजना करून या लाडक्या बहिणींना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या सगळ्या बाबी बघता लाडकी बहीण योजना लबडकीची ठरू नये मुख्यमंत्री साहेब एक बहीण मायेची तर दुसरी भटकंतीची बहीण वाऱ्यावर नसावी म्हणणे योग्य ठरेल
—————————————————————–

धनगर समाजासह भटक्या विमुक्त जातीसाठी विशेष उपाययोजना कराव्या

धनगर समाजातील महिला तसेच इतर भटक्या उभक्त जातीच्या महिला या परिवारासह उदरनिर्वाह करण्यासाठी भटकंती करत असतात या महिला व मुलींना शिक्षण आरोग्य यासह अनेक मूलभूत गरजांपासून वंचित रहावे लागते आता ही राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत या सर्व योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवा जुळव महिला करताना दिसत असले तरी धनगर समाजासह इतर भटक्या विमुक्त जमातीच्या महिलां यापासून वंचित आहेत या सर्व महिलांसाठी राज्य सरकारने विशेष उपाययोजना करून याही तुमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी उपाय योजना कराव्या अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे

फोटो कॅप्शन
लाडकी बहिण .. लबाडकीची योजना न ठरावी मुख्यमंत्री साहेब एक बहिण मायेची तर दुसरी भटकंतीची बहीण वाऱ्यावर नसावी..! याच ओळी या फोटोकडे बघुन सुचताय (छाया फिरोज शेख)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!