मनमाडनजीक हिसवळ जवळ ट्रकने चिरडल्या 50 मेंढ्या…


मनमाडनजीक हिसवळ जवळ ट्रकने चिरडल्या 50 मेंढ्या...

मनमाड(प्रतिनिधी):-मनमाड नांदगाव महामार्गावर मनमाड नजीक असलेल्या हिसवळ जवळ एका ट्रक चालकाने जवळपास 45 ते 50 मेंढ्या चिरडल्या व तेथून गाडी घेऊन धूम ठोकली स्थानिक नागरिकांनी तात्काळ मनमाड पोलीस ठाण्यात फोन केला पोलीस व स्थानिक नागरिकांनी मनमाड चौफुली येथे ट्रक पकडला व त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
           याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड नांदगाव महामार्गावर हिसवळ येथे मेंढपाळाच्या जवळपास 45 ते 50 मेंढ्या एका ट्रकने चिरडल्या व तेथुन धूम ठोकली स्थानीक नागरिक दत्तू पवार व इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व ट्रकचालकांबाबत मनमाड पोलीस ठाण्यात माहिती दिली काही तरुण ट्रक मागे पाठलाग करत आले व मनमाड पोलिसांनी देखील तात्काळ दखल घेऊन मालेगाव चौफुली येथे ट्रक पकडला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन गरीब मेंढपाळला न्याय मिळून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!