मनमाड एसटी डेपोकडुन चालक वाहक व प्रवाशांचा जीव धोक्यात…? वायपर नसलेल्या व खराब बसेस घेऊन जाण्याची चालकांवर जबरदस्ती…


मनमाड एसटी डेपोकडुन चालक वाहक व प्रवाशांचा जीव धोक्यात…? वायपर नसलेल्या व खराब बसेस घेऊन जाण्याची चालकांवर जबरदस्ती…


Advertisement
मनमाड(आमिन शेख):- एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या या ब्रीदवाक्याच्या अगदी उलटा कारभार मनमाड एसटी डेपोच्या अधिकारी वर्गा कडुन करण्यात येत असुन सध्या पावसाळा सुरू असूनही गाडीला वायपर नसलेल्या आणि खराब अवस्थेतील बसेस घेऊन जाण्यासाठी चालकांना भाग पाडण्यात येत असुन सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत  यामुळे जर अपघात घडला तर चालक वाहक व प्रवाशांचाही जीव धोक्यात टाकण्याचे काम मनमाड  एसटी डेपोच्या अधिकारी वर्गाकडून करण्यात येत आहे.
                एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी असे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या काही डेपो आणि काही अधिकारी यांच्याकडून पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असुन मनमाड एसटी डेपोच्या अनेक बसेस या नादुरुस्त आहेत यातील काही बसेस तर अक्षरशः मोडकळीस आलेल्या आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असुन अनेक बसेसला काचेवरचे वायपर नाही यामुळे ही बस चालवताना चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे चालक वाहक व प्रवाशी यांचा जीव धोक्यात येत असुन याबाबत अनेकदा चालकांनी तक्रारी देखील केल्या आहेत मात्र याकडे हे अधिकारी अजिबात लक्ष देत नसुन या चालकांना याच वायपर नसलेल्या व नादुरुस्त असलेल्या बसेस घेऊन जाण्यासाठी भाग पाडत आहे.भविष्यात पावसामुळे एखाद्या बसचा अपघात झाला आणि यात कोणतीही जीवितहानी झाली तर यास सर्वस्वी अधिकारी जबाबदार असतील मुळात नादुरुस्त गाड्या चालवुन चालकांचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याचे मत नागरीकांनी बोलून दाखवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!