शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या उदमांजराला जीवनदान…


नांदगाव (महेश पेवाल)  : शहरालगत असलेल्या गंगाधरी शिवारातील शेतकरी मोहन विठ्ठल इघे यांच्या शेतातील विहिरीमध्ये उदमांजर पडले होते. त्यास वन्यजीव संरक्षण संस्थेचे तालुका अध्यक्ष तथा सर्पमित्र प्रभाकर निकुंभ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढून त्यास जीवदान दिले आहे.
मोहन विठ्ठल ईघे यांची गंगाधरी शिवारात शेती असून यामध्ये विहीर आहे. नित्यनेमाने शेतात गेले असता त्यांना विहीरीत मांजरा सारखा दिसणारा प्राणी दिसला असता त्यांनी सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांना कळविले. निकुंभ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि वनविभाच्या कर्मचाऱ्यांसह
वरित घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत एका कोपऱ्यात उदमांजर बसलेल्या अवस्थेत दिसून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि निकुंभ यांनी त्यास सुरक्षितरित्या बाहेर काढले. निशाचर असलेला हा प्राणी अत्यंत भित्रा व लाजाळू आहे. हा प्राणी मिश्र आहारी असल्याची माहिती निकुंभ यांनी उपस्थितांना दिली. यावेळी वनविभागाचे अधिकारी सुनील महाले, वनरक्षक अमोल पवार ,संजय बेडवाल , पाटील. तसेच शेतकरी ज्ञानेश्वर इघे,भरत मोहन इघे, संयोग रमेश साळुंखे, इत्यादी शेतकऱ्यांनी याप्रसंगी मदत केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!