मनमाडला मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद…! २३ मोटारसायकल हस्तगत…!


मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड शहरात मागील काही महिन्यापासुन मोटार सायकल चोरी जाण्याच्या घटनामध्ये वाढ झाली होती. या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी घेतली व मनमाड पोलिसांना याबाबत सूचना केल्या त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे आकाश राऊत याला चोरीची मोटारसायकल विकताना अटक करून त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तब्बल २३ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.
                याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड शहर नांदगाव तालुका व आजूबाजूला असलेल्या चांदवड येवला लासलगाव या तालुक्यात मोठया प्रमाणावर मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या याबाबत नाशिक  जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सर्व पोलीस ठाण्याना विशेष तपास मोहीम राबवण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबविली यात अनेक ठिकाणी पाळत ठेवण्यात आली सीसीटीव्ही तपासण्यात आले यातच पोलिसांना सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे आकाश सुभाष राउत, रा- विवेकानंदनगर, मनमाड  भाबडवस्ती, डोणगावरोड मनमाड येथे चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी येत आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळताच डी.बी. पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ  व त्यांचे पथक असे बातमीच्या ठिकाणी सापळा लावून थांबले असता  आरोपी याने त्याचे ताब्यात असलेली हिरो स्लेंडर कंपनीची काळया रंगाची असलेली मोटार सायकल घेवुन आला असता त्यास डी. बी. पथकाने शिताफीने ताब्यात घेतले व त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याचे सोबत दुस-या मोटार सायकलवर असलेले त्याचे साथिदार  २) सद्‌गुरू शांतिगिरी गोसावी, डोणगावरोड, मनमाड ३) समाधान काळे, रा-बेजगाव, मनमाड ४) आकाश निकम रा-नांदगाव असे यांचे नावे सांगुन नाशिक जिल्हयामधुन विविध ठिकाणी २३ मोटार सायकली चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातुन विविध ठिकाणाडुन २३ मोटार सायकली जप्त करण्यात आले आहे.याबाबत शहर पोलीस ठाणे ठाण्यात  गु.२.नं. २३२/२०२४ IPC ३७९ प्रमाणे दि.०१/०६/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्हयात हिरो स्प्लेंडर कंपनीची काळया रंगाची एमएच ४१ बीजे ०५०९ हया मोटार सायकलचे हॅण्डल लॉक तोडुन चोरून नेली होती.तीही जप्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!