मनमाडच्या आयटीत काम करणाऱ्या तरुणांनी केली दिंडीत पायी वारी…!
मनमाडच्या आयटीत काम करणाऱ्या तरुणांनी केली दिंडीत पायी वारी…!
मनमाड(आवेश कुरेशी):- पुणे ते सासवड आयटी कंपनीतील शेकडो मुलं व मुलींनी पायी दिंडी काढली. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीची पालखी व मुक्ताईची पालखीचे सर्व आयटी कंपनीतील मुलं-मुलींनी मनोभावे दर्शन घेतले व समाजापुढे या तरुणांनी एक मोठा आदर्श ठेवला आहे.परमार्थ हा वृद्ध काळात न करता हा तरुण काळात झाल्यास मानसिक व शारीरिक थकवा यांचा परमानंदात रूपांतर होते.व या धार्मिक व विठूचा नामघोषात जीवनाचे खरे रहस्य लपलेले आहे.उच्चशिक्षित असलेल्या या तरुणांमध्ये परमार्थाची भावना पाहून भविष्यात धार्मिक कार्यात तरुण वर्ग पुढे येईल व एक आदर्श ठरेल.या पायी दिंडी सोहळ्यात प्रामुख्याने मनमाड शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थितत होते.त्यात तुषार ताठे, हनुमंत अवसारे, राजकुमार कणसे पंकज साखरवाडे ईश्वरी कणसे व इतर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.