शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत किशोर दराडे विजयी…! कोल्हेच्या उमेदवारीमुळे मतविभागणीचा महाविकास आघाडीला फटका..!
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत किशोर दराडे विजयी…!
कोल्हेच्या उमेदवारीमुळे मतविभागणीचा महाविकास आघाडीला फटका..!
नाशिक(प्रतिनिधी( : विधानपरिषद निवडणुकीत नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीचे किशोर दराडे यांनीच बाजी मारत आमदारकी कायम राखली.नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 1)अंबड वेअर हाऊस येथे मतमोजणीला दुपारी सुरवात झाली. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या दराडे यांनी आपली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली.अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर तर ठाकरे गटाचे उमेदवार अॅड. संदिप गुळवे तिसर्या क्रमाकांवर फेकले गेल्याने ठाकरे गटासाठी हा धक्का आहे.विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते यामुळे मराठा विद्या प्रसारकसह इतर मतांची विभागणी झाली याचा फटका महाविकास आघाडीला बसला विजयी कोटा 31 हजार 576 ठरवण्यात आला होता. . दरम्यान मतमोजणीत विजयाची मते कोणत्याही उमेदवाराला नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजली. त्यावर उमेदवाराचा विजय निश्चित करण्यात आला.नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये एकूण मतदान 64 हजार 853 झाली त्यापैकी 1 हजार 702 मते अवैध ठरली तर 63 हजार 151 मते वैध धरण्यात आली. राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत प्रथम मोजण्यात आलेल्या साठ हजार मतांमध्ये महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आ दराडे यांनी ठाकरे गटाचे गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना दणका देत पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व मतदान पत्रिकांची रसमिसळ करणे, त्यांचे गठ्ठे तयार करणे, प्रत्येक टेबलावर हजार मत पत्रिकांचे गठ्ठे मोजणीला देण्यात आले. मतमोजणीवेळी अवैध मतपत्रिका बाद करण्यात आल्या. सायंकाळी पाच नंतर मतमोजणीला सुरुवात झाली. साठ हजार मतमोजणीत दराडे यांनी पहिल्या फेरीत सर्वाधिक मते घेतली. विजयापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवाराला 31 हजार मतांचा कोटा पूर्ण करणे शक्य न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात दराडे हे विजयी घोषित करण्यात आले. किशोर दराडे यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेऊन ही जागा प्रतिष्ठा ची केली होती. उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.