मनमाड जंक्शनला लातूर पॅटर्न पद्धतीने रेल्वेने येणार पाणी…!


मनमाड(प्रतिनिधी)  :- दुष्काळी परिस्थिती पाचवीला पुजलेल्या मनमाड शहरात रेल्वे जंक्शनलाही याचा मोठा फटका बसतो गेल्या काही वर्षापासून सतत अत्यल्प पडत असलेला पाऊस यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठलेला तळ व जमिनीतील आटलेले पाणी यामुळे रेल्वे स्थानकाला देखील भूषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे भविष्यात असा त्रास होऊ नये यासाठी लातूर पॅटर्न वापरत रेल्वेने पाणी आणण्याची व्यवस्था भुसावळ तर्फे करण्यात आली असून याची काल चाचणी घेण्यात आली. दोन वॅगन मधुन 1 लाख 40 हजार लिटर पाणी आणून ते रेल्वेला पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लँट मध्ये घेण्यात आले भविष्यात गरज भासली तेव्हा रेल्वेच्या वॅगन मार्फत भुसावळ किंवा मुंबई येथून पाणी आणून रेल्वे स्थानक व रेल्वे वसाहतीना पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
               या बाबत सविस्तर वृत्त असे की मध्ये रेल्वेत मनमाडचे रेल्वे स्टेशन महत्वपूर्ण जक्शन मानले जाते येथून रोज सुमारे 125 प्रवासी रेल्वे गाड्या धवतात त्यामुळे सर्वच फ्लॅटफार्मवर  प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यातील डब्या मध्ये येथे पाणी भरले जाते.महत्वपूर्ण जक्शन आणि येथे रेल्वेचे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे नट, बोल्ट, गार्डर यासह इतर साहित्य सामुग्री तयार करणारा ब्रिटिश कालीन कारखाना असल्यामुळे येथे रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे त्यांच्या सहा वसाहती आहे या सर्वाना पाणी पुरवठा करण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून जवळ एकं बंधारा आहे त्यातून पाणी पुरवठा केला जात होता मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बांधाऱ्यात पुरेसे पाणी येत नव्हते त्यामुळे रेल्वेने देखील पालखेड धरणात पाण्याचे आरक्षण केले त्यामुळे शहरा पाठोपाठ रेल्वेचा पाणी पुरवठा देखील पावसावर कमी तर पालखेड धरणातून आवर्तना द्वारे मिळणाऱ्या पाण्यावर जास्त अवलंबुन आहे.पालखेड धरणातून पाणी मिळाल्यानंतर पालिका प्रशासन शहरात कधी 20 नंतर तर कधी कधी महिन्यातून एकदा पाणी पुरवठा करते मात्र रेल्वेला तसें करता येत नाही त्यांना रेल्वे स्टेशन, वर्क शॉप मध्ये रोज पाणी पुरवठा करावा लागतो शिवाय लांब पल्ल्याच्या काही गाड्यातील डब्यात ही रोज पाणी भरावे लागते त्यासाठी रेल्वेला रोज मोठया प्रमाणात पाण्याची गरज असते ही गरज पालखेड धरणातून रोटेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यावर भागात नाही.गेल्या वर्षी पावसा अभावी निर्माण झालेल्या पाणी टंचाईची धग अद्यापही कायम आहे. ही धग कमी करण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाने वेगळी शक्कल लढवून भुसावळ आणि नाशिक येथून थेट रेल्वेने पाणी आणण्याचा निर्णय घेतला असून आज पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे आज 70,70 हजार लिटर पाणी घेऊन दोन रेल्वेचे टँकर वॅगन आले होते दोन्ही टँकर रुळा जवळ असलेल्या फिल्टर प्लॅन्ट जवळ उभे करण्यात आले होते फिल्टर प्लॅन्ट मध्ये या टँकर मधून पाणी घेण्यासाठी वेगळी नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने दूरदृष्टी ठेवत ही आगळीवेगळी पाणी पुरवठा योजना सुरु केल्यामुळे आगामी काळात प्रवासी, रेल्वे कर्मचारी,रेल्वे वर्क शॉप मधील कामगारांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही शिवाय लांब पल्ल्याच्या गाडीतील डब्यात देखील मागणीनुसार पाणी भरले जाणार आहे त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे
लातूर नंतर मनमाडला रेल्वेने पाणी!
एकेकाळी भीषण पाणीटंचाईला सामोरे जाणारे महाराष्ट्रातील अनेक गावात वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात आले यात लातूर पॅटर्न हा सगळ्यात वेगळा ठरला मराठवाड्यातील लातूर या भागात अक्षरशः रेल्वे गाडीमधून पाणी आणून लातूर जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवण्यात आली यानंतर रेल्वेने पाणी आणणाऱ्या शहरातील यादी मनमाड शहराचे नाव जोडले गेले असून लातूर नंतर आता भविष्यात मनमाडला देखील रेल्वे पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!