प्रा लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा…. तहसीलदार यांना निवेदन देऊन दिला पाठिंबा…
प्रा लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा…. तहसीलदार यांना निवेदन देऊन दिला पाठिंबा…
नांदगाव (महेश पेवाल ) :- नांदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत, सरकारने गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची आणि उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडवावेत अशी मागणी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणा संदर्भात मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगेच्या मागण्यामुळे केवळ ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे असे नाही तर दलीत आदिवासीचे आरक्षण देखील धोक्यात आले आहे. मनोज जरांगेच्या मागण्याप्रमाणे जात वैधता ठरवतांना “सगे सोयरे हा शब्द कसोटयांमध्ये समाविष्ट केल्यास सर्व उच्च जातींना SC/ST/OBC मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा ‘महामार्ग निर्माण होईल व आरक्षणाला अर्थही राहणार नाही.मनोज जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास सुप्रिम कोटांचा अवमान होईल. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा जात ही पुढारलेली असल्याने तिला महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण रद्द केले आहे. घटनेच्या १५ (4) १६ (4) व ३४० परिच्छेदानुसार मराठ्यांना आरक्षण असंविधानिक आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने निजामकालीन खोट्या कुणबी नोंदी व सुक्रे आयोग यांच्या कार्यपध्दती शंकास्पद असल्याचे सिध्द झाले आहे.
उपोषणकर्ते ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या मागणीनुसार २००४ पासूनची सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे त्वरीत रद्द करण्यात यावीत, जात वैधता कसोटयांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करु नये. वडीगोद्री ता. अंबड जि. जालना येथे उपोषणास बसलेले उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ बाघमारे यांच्या उपरोक्त मागण्या महाराष्ट्र शासनाने त्वरीत मान्य करुन उपोषण आंदोलनाची सांगता करावी अन्यथा नांदगांव तालुका सकल ओबीसी समाजाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलनं करण्यात येईल त्याच्या परीणामाची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल. उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत बिकट होत असून त्यातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ शकतो याबाबत शासनाने गांभिर्याने दखल घ्यावी अशी विनंती नांदगाव तालुका सकल ओबीसी समाज बांधवांनी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी संजय सानप, वाल्मिक टिळेकर, बाळासाहेब बोरकर, डॉ. गणेश चव्हाण, संजय मोकळं, डांगे, बळवंत शिंदे, अरविंद पारखे, बिरु शिंदे, खुशाल सोर, सुनील सोर, हेमंत देवडराय, अशोक पाटील, त्र्यंबक शेरमाळे, संजय देवकाते, रवी सानप,
शरद उगले, महाजन, शंकर शिंदे, अनिल आहेर, आनंद सुरसे, सचिन देवकाते, दिपक खैरनार, अमोल सरक, वैजनाथ भावसार, मोहन सोमासे, महेश पवार, संतोष गायकवाड, सोमनाथ पाटील, रविंद्र सोनवणे, सुर्यभान खैरनार आदींसह मोठ्या संख्येने सकल ओबीसी बांधव उपस्थित होते.