गायिका गुणगुन रणयेवलेयांचा क्रांतिकारी भीमगिताचा कार्यक्रम संपन्न…!
गायिका गुणगुन रणयेवलेयांचा क्रांतिकारी भीमगिताचा कार्यक्रम संपन्न…!
मनमाड(अजहर शेख): – तथागत भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त महाराष्ट्राची लाडकी गायिका गुणगुन रणयेवले व कलावंतांचा क्रांतीकारी भिमगितांचा कार्यक्रम शाकुंतल नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तत्पुर्वी तथागत भगवान गौतम बुध्द पुष्पपुजा व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थित प्रमुख अतिथी मा. नगराध्यक्ष तथा रिपाइं ग्रा. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, रिपाइंचे जेष्ठ नेते गंगादादा त्रिभुवन, मा. नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख मयुर बोरसे, मा. नगरसेवक संतोष आहिरे, स्वारिप शहर अध्यक्ष संजय भालेराव, समाजसेवक पापा थॉमस, मजिददादा शेख, येवला तालुका कार्याध्यक्ष विजय घोडेराव, अजिज शेख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच महाराष्ट्रातील लाडकी गायीका गुणगुण रणयेवले यांचा सत्कार मायाताई त्रिभुवन, कमलताई खरात, सुनील सोनवणे, मंगलताई वाघमारे, सुशिलाबाई कांबळे, उषाताई पठारे यांनी स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला. यानंतर ‘आकाशातील तारा माझ्या बापाचा देश सारा’ हे गाणे गायीका गुणगुण रणयेवले गायला सुरुवात केली व एकच जल्लोष उपस्थितांमध्ये होत होता यानंतर विविध भिमगीते सादर करण्यात आली. कार्यक्रमास शाकुंतल नगर, 28 युनिट, बेंद्रे चाळ, भिमराज नगर, हबीब नगर, आनंदवाडी आदिंसह वार्डातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, स्वारिपचे जिल्हा नेते भगवान भोसले व येवला तालुक्याचे नेते अजिजभाई शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कवी गायक सुनिल खरे, अमोल नरवडे, आकिब पठाण, तौफिक खान, भिमानंद महिरे, नदीमसय्यद, किरण आहिरे, निलेश व्यवहारे, रवि निकम, मोनिष चाबुकस्वार, बाळासाहेब खरे, पप्पु दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास आहिरे यांनी केले तर आभार मुकेशभाऊ थोरात यांनी मानले. आयोजन मुकेशभाऊ थोरात, बाबाभाई पठाण, अक्षय त्रिभुवन, राहुल गायकवाड, महेश सोनवणे यांनी केले.