आचारसंहिता काळात वाटप न केलेला आनंदाचा शिधा वाटप करावा…
आचारसंहिता काळात वाटप न केलेला आनंदाचा शिधा वाटप करावा…
नांदगाव(महेश पेवाल):- राज्य सरकार तर्फे देण्यात येणारा आनंदाचा शिधा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वाटप करण्यात आला नव्हता सध्या आचारसंहिता शिथिल झाली असुन तरी नागरिकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा अशी मागणी नांदगाव भाजपा युवा शहराध्यक्ष अभिषेक विघे व बोलठाण येथील माजी सदस्य लक्ष्मी गायकवाड यांनी पत्रकाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकार तर्फे देण्यात येणारा आनंदाचा शिधा शंभर रुपयांमध्ये गोरगरिब जनतेला वाटप करण्यात येणार होता मात्र आचारसंहितेमुळे तो आनंदाचा शिधा वाटप झाला नाही तरी लवकरात लवकर आनंदाचा शिधा वाटप करण्यात यावा
तसेच सदरील नांदगाव शहर व तालुक्यातील रेशन दुकानदार हे ग्राहकांना धान्य दिलेले पावती देत नसून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. तरी सदरील ग्राहकांना मशीनची ऑनलाईन पावती देण्यात यावी अन्यथा मोठ्या स्वरूपात जन आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.