गोदावरी रेल्वे माल धक्का, ओव्हरब्रीज परिसरात मटका व जुगार अड्यांचा सुळसुळाट; पोलीसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष संतोष आहिरे यांनी दिला आंदोलनाचा ईशारा…
गोदावरी रेल्वे माल धक्का, ओव्हरब्रीज परिसरात मटका व जुगार अड्यांचा सुळसुळाट; पोलीसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष संतोष आहिरे यांनी दिला आंदोलनाचा ईशारा…
मनमाड(प्रतिनिधी): – मनमाड शहर हे कामगार लोकवस्तीचे शहर असून गोदावरी रेल्वे माल धक्का, ओव्हरब्रीज या परिसरात मोठ्या प्रमाणात मटका व जुगार अड्यांचा सुळसुळाट वाढला आहे यामुळे या भागात गुन्हेगारीदेखील वाढली आहे. याबाबत शहर पोलीसरटेशनला फोनव्दारे माहिती दिली तेव्हा पोलीसांनी धातुरमातुर स्वरुपाची कार्यवाही केली व पोलिसांची पाठ वळताच लगेचच काही तासाच्या अवधीनंतर सदर अवैध धंदे पुन्हा सुरु होतात यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना पोलीसांचा कुठलाच धाक राहिलेला नाही यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे सदर अवैद्य धंदे सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष आहिरे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
मनमाड शहरातील अनेक शासकीय व खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत या अवैध धंद्यामुळें या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाच्या नागरिकांचा वावर वाढतो परिणामी रोज गुन्हे घडतात या अवैध धंद्याबाबतीत अनेकदा निवेदन फोनद्वारे तक्रारी देऊन देखील पोलीस याकडे दुर्लक्ष करतात मुळात पोलीसांना या सर्व गोष्टींचा हफ्ता पोहचवला जातो यामुळे याशिवाय या धंद्यावाल्याना मोठा राजकीय वरदहस्त असुन त्यामुळे पोलीस कारवाई करत नाही असा आरोप माजी नगरसेवक संतोष आहिरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे मुळात संतोष आहिरे यांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक 25/5/20024 रोजी रजिष्टर व्दारे तक्रार अर्ज केलेला आहे परंतु आज पावेतो यावर ठोस कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे सदर अवैद्य धंद्याचा सुळसुळाट वाढला असून गुन्हेगारी देखील वाढत आहे. त्यामुळे मनमाड शहर पोलीसांचा अवैद्य धंदेवाल्यांशी अर्थपूर्ण व्यवहार असल्यामुळे सदर अवैद्य धंदे राजरोसपणे चालू आहे.सदर अवैध जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद करणेकामी योग्य ती कार्यवाही करावी व अवैध धंदे करणाऱ्यांवर जरब बसावा जेणे करून भविष्यात याठिकाणी पुन्हा जुगार मटका अवैध व्यवसाय चालणार नाही व गुन्हेगारी होणार नाही सदर बाबत कार्यवाही व्हावी अन्यथा याबाबत मी स्वतः शिष्टमंडळ घेऊन वरिष्ठांना भेटून याबाबत तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याचे तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.
रेल्वेलाही दिला जातो हफ्ता…!
कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण केले तर ते प्रशासन तात्काळ हटवते राज्य शासनापेक्षा केंद्रीय यंत्रणा अतिशय फास्ट आहे मुळात रेल्वेच्या गोदावरी माल धक्का या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे मात्र या सगळ्या गोष्टीकडे लोहमार्ग पोलिस व आर पी एफ या दोघांचेही अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे मुळात रेल्वेला देखील या अवैध धंद्यासाठी हफ्ता दिला जातो म्हणून रेल्वे कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांकडुन केला जात आहे.